Home /News /news /

'या' देशातील महिला सेक्सला कंटाळल्या, पतीमुळे लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी

'या' देशातील महिला सेक्सला कंटाळल्या, पतीमुळे लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

या देशातील महिलांनी लॉकडाऊनबाबत तक्रार केली आहे. पती वारंवार सेक्सची मागणी करत असल्यामुळे लॉकडाऊन संपवावा आणि पुरुषांना कामावर धाडावे अशी मागणी या महिला करत आहे.

    घाना, 18 एप्रिल : कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊनची सुरूवात झाली. आफ्रिकन देशांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. घाना हा देश सुद्धा याच देशांपैकी एक. घानामध्ये देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र याठिकाणच्या महिलांनी लॉकडाऊनबाबत तक्रार केली आहे. पती वारंवार सेक्सची मागणी करत असल्यामुळे लॉकडाऊन संपवावा आणि पुरुषांना कामावर धाडावे अशी मागणी या महिला करत आहे. सोशल मीडियावर अशी मागणी करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हे वाचा-COVID-19: सर्वात मोठी बातमी! ऑक्टोबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता) घानामध्ये 566 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर आतापर्यंत 8 जणाचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन जारी केल्यानंतर लगेचच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ या महिलेने नेमका कधी पोस्ट केला याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान काही काळातच हा व्हिडीओ घानामधील माध्यमांमध्ये हेडलाइन बनला होता. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार 11 एप्रिल रोजी Ghana MMA या वेबसाइटने ही बातमी प्रसिद्ध केली होती.  या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या महिलेने लॉकडाऊनचे उल्लंघन ऑफिस गाठले आणि च्यानंतर हा व्हिडीओ शूट केला. यामध्ये ती म्हणते आहे की मी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे पण पोलिसांना माझी परिस्थिती समजेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या महिलेला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या