'या जगाला Good Bye बोला, तुमची निघण्याची वेळ झालीय...'

'या जगाला Good Bye बोला, तुमची निघण्याची वेळ झालीय...'

सीरियामधला एक दुकानदार हमीद आलुसेफ.. रासायनिक हल्ल्यात त्यानं आपल्या जुळ्या मुलांना गमावलं.

  • Share this:

अमेय चुंभळे, मुंबई

07  एप्रिल : दोन दिवसांपूर्वी सीरियात लढाऊ विमानांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. रासायनिक हल्ल्यानंतरचे भीषण चित्र समोर येताच जगभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात जुळ्या मुलांचाही मृत्यू झाला आहे. मुलांनो चला लवकर या साऱ्या जगाला Good Bye बोला, तुमची निघण्याची वेळ झालीय अशी भावनिक प्रतिक्रिया या मुलांच्या वडिलांनी दिली होती. या जुळ्या मुलांच्या अंत्ययात्रेचे फोटो मन सून्न करणारे आहेत.

सीरियामधला एक दुकानदार हमीद आलुसेफ.. रासायनिक हल्ल्यात त्यानं आपल्या जुळ्या मुलांना गमावलं. आया आणि अहमद अशी या गोड चिमुरड्यांची नावं. हमीदचं दुःख इथेच संपत नाही.. त्यानं त्याच्या  जवळचे 29 जण या युद्धात गमावले.. पत्नी, त्याचे 2 भाऊ, भाचे आणि मित्र...  आता हमीद एकटाच उरला आहे. परिवार नाही, परिसर बेचिराख... भवितव्य अंधारात...

सीरियामध्ये अनेक वर्षांपासून यादवी माजलीय. बॉम्बपासून आज वाचलो तर उद्या जगू, हे अनेकांच्या आयुष्याचं वास्तव आहे. पण सर्वात जास्त वाईट वाटतं ते लहान मुलांचं. केमिकल हल्ला झाल्यावर हमीदची जुळी मुलं 10 मिनिटं जिवंत होती. पण नंतर त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या चिमुकल्यांचा जीव गेला आहे.

चूक कुणाची, असादची की अमेरिकेची... हे सगळं दोन मिनिटं बाजूला ठेवू.. आणि हा विचार करू की यात मुलांची काय चूक होती.. त्यांनी कुणाचं काय वाईट केलं होतं.. कोवळे जीव, डोळ्यात मिष्किल भाव, आई-वडील आणि भावंडं एवढंच त्यांचं जग असावं. त्यांचा असा जीव घेण्याचा हक्क देशाच्या हुकुमशहाला मिळतो का? अमेरिका किंवा इंग्लंडच्या मुलांसारखाच त्यांना सुरक्षित बालपणाचा हक्क नाहीय का?

मुलांना जन्म दिला तेव्हा त्यांच्या आयांनी किती स्वप्न पाहिली असतील. मुलाच्या मृतदेहाबरोबरच ती स्वप्न पुरण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. या आईबापांनी  आता काय करायचं...? कधी काळी त्यांना गोंडस मुलं होती, या आठवणी सांगत जगत रहायचं पुढचा बॉम्ब पडेपर्यंत.. ते  अजून करणार तरी काय...?

सत्ता, देश, राज्य अशीच एकमेकांशी भांडत राहणार आणि लहान मुलांच्या कबरी भरत जाणार. मीडियाही त्यांचे फोटो दाखवणार पण हे फक्त युद्ध  सुरु असेपर्यंतच... युद्ध संपलं की मग सगळं शांत.

First published: April 7, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading