नशेत असताना मुलीनेच बलात्कार केला, वडिलांचा कोर्टात खुलासा

नशेत असताना मुलीनेच बलात्कार केला, वडिलांचा कोर्टात खुलासा

आरोपीने मुलीशी संबंध असल्याचं कबूल केलंय मात्र शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावलाय.

  • Share this:

सिंगापूर 19 नोव्हेंबर : सिंगापूरमध्ये बलात्काराच्या एका प्रकरणाने खळबळ उडवून दिलीय. गेल्या चार वर्षांपासून हा खटला सुरू असून या खटल्यात आरोपी असलेल्या वडिलाने त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र कोर्टात या वडिलाने जो खुलासा केला त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. मी नाही तर मुलीनेच नशेत असताना माझ्यावर जबरदस्ती केली असा खुलासा त्या आरोपीने केल्याने खळबळ उडालीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून पोलीस आता नव्याने चौकशी करत आहे.

आरोपी 53 वर्षांचा असून त्याची मुलगी 23 वर्षांची आहे. मुलीचं लग्न झालं मात्र ते फार काळ टिकलं नाही. त्यामुळे तिला एकटेपणा वाटत होता. त्यातच ती दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेली. त्या अवस्थेत असतानाच तिने जबरदस्ती केली. त्यानंतर आमचे अनेकदा संबंध आले मात्र त्यात माझा दोष नव्हता तर तिनेच ते काम करायला भाग पाडलं असंही त्याने कोर्टात सांगितलं.

चारित्र्यावरून संशय.. मित्राच्या मदतीने पतीने केला पत्नीचा खून

दोघांमध्ये भांडणं होऊ लागल्याने ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. मुलीने त्याच्यावर चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याचाही आरोप केला होता. माझी तिच्याशी संबंध होते मात्र चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याची गोष्ट खोटी असल्याचंही त्याने कोर्टात सांगितलं. तर मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत वडिलांवर शस्राच्या धाकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण कोर्टात गेलं आणि नंतर त्यात अनेक धक्कादाय खुलासे होऊ लागले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 11:07 PM IST

ताज्या बातम्या