लंडन 08 ऑक्टोंबर : दक्षिण अमेरिकेतल्या बोलिव्हीया (Bolivia) देशात वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. वडिल आणि मुलीचं नातं हे खास समजलं जातं. माणुसकी आणि संवेदना याचे अनेक पदर असलेल्या या नात्याला एका नराधमाने काळीमा फासलीय. या वासनांध बापाने स्वत:च्या अल्पवयीन असलेल्या 13 वर्षाच्या मुलीलाच वासनेची शिकार बनवलं. त्यामुळे बोलिव्हीयात खळबळ उडाली असून या नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली जातेय. हे घाणेरडं कृत्य कशामुळे केलं असं जेव्हा त्याला पोलिसांनी विचारलं तेव्हा त्याने जे कारण सांगितलं हे ऐकूण कुणाही सभ्य माणसाचा पारा चढल्याशीवाय राहणार नाही.
अल कायदाचा जहाल दहशतवादी ठार, 'उमर'ने भारताला केलं होतं टार्गेट!
'डेली स्टार'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी जी माहिती दिलीय ती तर अतिशय संतापजनक आहे. 4 ऑक्टोंबरची ही घटना असून त्या दिवशी त्या व्यक्तिच्या मुलीचा 13 वा वाढदिवस होता. मुलीची ओळख पटू नये यासाठी पोलिसांनी आरोपी असलेल्या तिच्या वडिलांचं नाव जाहीर केलं नाही. मुलीने वडिलांना वाढदिवसाचं गिफ्ट आणायला सांगितलं होतं. मात्र तो गिफ्ट आणू शकला नाही.
वकील तरुणीच्या अंगावर अॅसिड फेकून गळ्यातली सोनसाखळी ओरबडली
गिफ्ट आणणे शक्य झालं नसल्यामुळे मुलीला काही तरी सरप्राईज द्यावं म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. घरी आल्यावर त्याने बायकोला घराबाहेर जाण्यास सांगितलं. मुलीशी काही वेळ एकांतात घालवायचा आहे असं त्याने बायकोला सांगितलं. बायको बाहेर गेल्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला.
पत्नीचे नवऱ्याच्या मित्राशीच अनैतिक संबंध, विरोध केल्याने सासूची हत्या
काही वेळात बायको घरी आल्यानंतर तिला हे कळालं तेव्हा त्याने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये जावून ही सगळी माहिती दिली आणि नवऱ्याला बेड्या ठोकायला सांगितलं. पोलिसांनी विकृत बापाला अटक केली असून मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. तिला मानसिक धक्का बसला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा