S M L

आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे- ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला आमच्या सेन्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2017 01:53 PM IST

आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे- ट्रम्प

14 एप्रिल :  अमेरिकेने अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला आमच्या सेन्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी लष्कराचे अभिनंदन करून त्यांनी सैन्यदलाचे दहशतवादी विरोधी लढ्यात मनोबल वाढवलं आहे. वॉशिंगटनमध्ये पत्रकार परिषद घेवून ट्रम्प यांनी लष्करी कारवाई सफल झाल्याचं म्हटलं.

‘इसिस’चा सुळसुळाट असलेल्या अफगाणिस्तानच्या पूर्व भागात नांगरहारमध्ये हा हल्ला केला गेला आहे. आयसिसचं एक गुप्त ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी हा बॉम्ब हल्ला केला गेला. जीबीयू-43बी असं या बॉम्बचं नाव आहे. याचं वजन 11 टन इतकं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री  साडे आठ वाजता हा हल्ला झाला. एमसी 130 या अमेरिकन लढाऊ विमानातून हा बॉम्ब टाकण्यात आला आहे. हा अणुबॉम्ब नसला तरी अणुबॉम्ब एवढंच नुकसान करण्याची क्षमता याच्यात आहे. फक्त नंतर किरणोत्सर्ग होत नाही, एवढंच. जिथे हा हल्ला झाला, ते ठिकाण पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेच्या जवळ आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी  वॉशिंगटनमध्ये पत्रकार परिषद घेतली. 'अमेरिकन लष्कराला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळेच 'आयसीस'चे तळ उद्धवस्त करण्यात त्यांना यश आलं आहे. लष्कराची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र अशी कारवाई गेल्या आठ वर्षात व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही, असं म्हणत ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 12:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close