कोरोना-कोरोना ओरडत मेट्रोत धावला, त्यानंतर त्याचं काय झालं? व्हिडिओ पाहा

कोरोना-कोरोना ओरडत मेट्रोत धावला, त्यानंतर त्याचं काय झालं? व्हिडिओ पाहा

कोरोनाव्हायरससंबंधित (Coronavirus) प्रँक (Prank) करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:

मॉस्को, 13 फेब्रुवारी – चीनच्या (China) जीवघेण्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नावानेच संपूर्ण जगाचा थरकाप होतो आहे, सर्वत्र भीतीचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीचा फायदा घेत प्रँक (Prank) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

रशियामधील एका प्रँकस्टारला (Prankstar) कोरोनाव्हायरसवरून प्रँक करणं भोवलं आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास दिल्याच्या आरोपात तरुणाला 5 वर्षांची जेल आणि 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चीनमधील जीवघेण्या कोरोनाव्हायरसशी संबंधित हा प्रँक व्हिडिओ (Prank video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्रँक साइटवरील हा व्हिडिओ आता हटवण्यात आला आहे.

हेदेखील वाचा - पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक

हा व्हिडिओ पाहाल तर मेट्रोत एक तरुण मास्क लावून येतो आणि लोकांच्या समोर पडतो. त्यानंतर दुसरा एक तरुण तिथे येऊन मोठमोठ्याने कोरोना-कोरोना ओरडत धावू लागतो. यामुळे मेट्रोतील इतर लोकंही घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागतात.

पोलिसांनी हा प्रँक व्हिडिओ बनवणाऱ्या प्रँकस्टारला अटक केली आहे. शिवाय त्याच्या इतर 2 साथीरांचाही शोध सुरू आहे, ज्यांनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला मदत केली होती.

प्रँक बनवणाऱ्या तरुणाच्या वकिलाने सांगितल की, या तरुणाविरोधात पोलिसांनी वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर तरुणानं स्वत:ला सरेंडर केलं. एका छोट्याशा मस्करीमुळे लोकांना त्रास होईल याचा विचारही त्याने केला नव्हता. त्याला फक्त नागरिकांना सावध करायचं होतं.

हेदेखील वाचा - तुम्हीही असू शकता 'कोरोना'चे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण

First published: February 13, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या