चुकूनही करु नका महिलेच्या सौंदर्याची तारीफ, खावी लागेल तुरुंगाची हवा

चुकूनही करु नका महिलेच्या सौंदर्याची तारीफ, खावी लागेल तुरुंगाची हवा

महिलांच्या सौंदर्याची तारीफ करणे आणि त्यांना कॉफी-डिनरची ऑफर देण आता पुरुषांना महागात पडणार आहे.

  • Share this:

दुबई,6 मार्च:महिलांच्या सौंदर्याची तारीफ करणे आणि त्यांना कॉफी-डिनरची ऑफर देण आता पुरुषांना महागात पडणार आहे. अरब देशात महिलांशी फ्लर्ट करणे, त्यांची प्रशंसा करणे किंवा त्यांना कॉफी-डिनरची ऑफर देणाऱ्या पुरुषाला आता तुरुंगात जावं लागू शकतं.

'खलीज टाइम्‍स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा सहकारी, कर्मचारी किंवा अधिकारी गरजेपेक्षा जास्त तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल, महिलेच्या सौंदर्याची प्रशंसा करत असेल तसेच तिला कॉफी किंवा डिनरची ऑफर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अरब देशात नव्या कायद्यात फ्लर्ट करणे गुन्हा मानण्यात आले आहे. एवढंच नाही तर त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा..कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL

अरब संस्कृतीचा हवाला देऊन तयार करण्यात आला कायदा..

महिलांचा सन्मान न करणे, महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणे, अरब संस्‍कृती आणि परंपरेच्या विरोधात आहे. 1987 च्या केंद्रीय कायद्यानुसार महिलेला अपमानजनक वागणूक देणे गुन्हा मानले जाते. सोशल मीडिया तसेच मेसेज पाठवून महिला अपमानित करणे गुन्हा आहे.

हेही वाचा..रानू मंडल पाठोपाठ बहीणही झाली स्टार, कीर्तनाच्या चालीवर गायलं 'तेरी मेरी कहाणी'

एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा...

अरब पीनल कोडच्या आर्टिकल 359 नुसार दोषी व्यक्तीला एक वर्षाचा तुरुंगवास किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. तसेच 10 हजार दिरहमचा (Dirham)दंड शिक्षा सुनावण्यात येते. गुन्हेगार विदेशी नागरिक असेल तर त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची देशातून हकालपट्टी करण्यात येते.

दरम्यान, सऊदी अरबमध्ये कठोर कायदे आहेत. सऊदी अरबमध्ये अलिकडे महिलांना ड्रायव्हिंग करणे, क्रीडा प्रकारात सहभागी होणे, नोकरी करण्यात मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा..सनी लिओनी कठीण वर्कआउट करते तेव्हा... पाहा हा VIDEO

First published: March 6, 2020, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading