G-7मध्ये PM मोदींची क्रिकेट डिप्लोमसी, अ‍ॅशेस विजयाच्या ब्रिटिश पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा

G-7मध्ये PM मोदींची क्रिकेट डिप्लोमसी, अ‍ॅशेस विजयाच्या ब्रिटिश पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी (25 ऑगस्ट)फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. येथे पोहोचल्यानंतर फ्रान्सच्या बिआरिट्ज शहरात पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी (25 ऑगस्ट)फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. येथे पोहोचल्यानंतर फ्रान्सच्या बिआरिट्ज शहरात पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. यावेळेस पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. यादरम्यान, द्विपक्षीय महत्त्व असलेल्या अनेक विषयांवर दोघांनी चर्चा केली. सोमवारी (26 ऑगस्ट) पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पर्यावरण, दहशतवाद आणि डिजिटल यांसारख्या जागतिक मुद्यांवर पंतप्रधान मोदी चर्चा करतील.

पंतप्रधान मोदी-UN सरचिटणीस भेट

पंतप्रधान नरेंद्र यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अन्तोनिओ गुतेरेस यांचीही भेट घेतली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये पर्यावरण, दहशतवादासारख्या विषयांवर व्यापक चर्चा झाली.

पीएम मोदींची क्रिकेट डिप्लोमसी

पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या दोघांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासंदर्भात चर्चा झाली. याशिवाय, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण-सुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रात एकत्र मिळून काम करण्यासंदर्भातही चर्चा झाली. चर्चा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंड क्रिकेट टीमनं मिळवलेल्या विजयाच्या शुभेच्छा ब्रिटनच्या पंतप्रधानांना दिल्या. टीम इंग्लंडनं अ‍ॅशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं.

कोणत्या मुद्यावर होऊ शकते चर्चा

असं म्हटलं जात आहे की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढलेला तणाव पाहता भारताला जी-7 शिखर परिषदेचं निमंत्रण दिलं गेलं आहे. काश्मीर मुद्दा हा निमंत्रणामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ हटवणं अंतर्गत बाब असल्याचं यापूर्वीच भारतानं स्पष्ट केलं आहे. काश्मीर मुद्यावर केवळ पाकिस्तानसोबतच चर्चा होईल.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:35 AM IST

ताज्या बातम्या