अल कायदाचा जहाल दहशतवादी ठार, 'उमर'ने भारताला केलं होतं टार्गेट!

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 10:15 PM IST

अल कायदाचा जहाल दहशतवादी ठार, 'उमर'ने भारताला केलं होतं टार्गेट!

काबूल 08 ऑक्टोंबर : अफगानिस्तान (Afghanistan) च्या सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त कारवाईत आसिम उमर (Asim Omar)  या जहाल दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. AFP या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीय. आसिम उमर  हा पाकिस्तानी नागरिक होता. उमरसोबतच अन्य 6 दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाने कंठस्नान घातलं. उमर हा भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याचं टार्गेट हे भारत असल्याने त्याचा खात्मा करणं हा भारतीय सुरक्षा दलाला मोठा दिलासा आहे. अफगाणिस्तान आणि अमेरिकेने गेल्या महिन्यात एक संयुक्त मोहिम राबवली होती. त्यात 22, 23 सप्टेंबरला उमर ठार झाला होता. मात्र ही माहिती बाहेर आली नव्हती. 8 ऑक्टोंबरला उमर ठार झाल्याच्या माहितीला पुष्टी देण्यात आली. 2014मध्ये त्याला भारतीय उपखंडाचा अल कायदाचा प्रमुख करण्या आलं होतं. त्यामुळे त्याच्यापासून भारताला मोठा धोका होता.

वाचा- जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू - उद्धव ठाकरे

उमरसोबत जे दहशतवादी ठार झाले होते तेही सर्व पाकिस्तानी होते अशी माहितही सूत्रांनी दिलीय. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी दक्षिणी हेलमंड प्रांतात ही कारवाई केली होती. त्यात हे सर्व जण ठार झाले होते. सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने मूसा काला जिल्ह्यातल्या तालिबानच्या एका कॅम्पवर हा हल्ला केला होता. त्या कारवाईत हे दहशतवादी ठार झालेत.

वाचा- धनंजय मुंडेंसाठी 82 वर्षांचा 'हा' नेता गाजवणार मैदान!

ही कारवाईत जास्त वेळ चालली होती. उमरला तालिबानच्याच एका परिसरात दफन करण्यात आलं होतं. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अंग काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर ही मोठ्या कारवाईपैकी एक कारवाई समजली जाते. अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता चर्चा सुरू होती. मात्र तालिबानने हल्ले सुरूच ठेवल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक ही चर्चा थांबवली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...