धक्कादायक! लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू

प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, पाहुण्यामंडळींनी भरलेल्या रिसेप्शनमध्ये हॉलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 12:07 PM IST

धक्कादायक! लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू

काबूल, 18 ऑगस्ट : अफगाणिस्तानची (Afghanistan)राजधानी काबुलमध्ये एका लग्नसोहळ्यादरम्यान मोठा बॉम्बस्फोट (Explosion) घडवण्यात आला. या घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री उशिरा हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, पाहुण्यामंडळींनी भरलेल्या रिसेप्शनमध्ये हॉलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडला. काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरातील एका लग्न समारंभामधील ही घटना आहे.

अफगाणिस्तानातील गृह मंत्रालयानुसार, स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री जवळपास 10.40 वाजता हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही.

(वाचा : वेटरनं सँडविच द्यायला केला उशीर, ग्राहकानं गोळ्या झाडून केली हत्या)

लग्नसोहळ्यात 1200 लोकांना देण्यात आलं निमंत्रण

स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या मृतांचा आकडा अद्याप जारी केलेलं नाही. दरम्यान, गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नुसरत रहिमी यांनी सांगितलं की शनिवारी झालेल्या या स्फोटात 30 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

Loading...

(पाहा : SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!)

8 ऑगस्टला 14 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये स्फोट होण्याची महिन्यातली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 8 ऑगस्ट रोजीही मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता तर 145 जण जखमी झाले होते.

(पाहा : VIDEO : व्हॉट्सअ‍ॅपच्या फेक मेसेजवर ठेवला विश्वास, मृत मुलांना ठेवलं मिठात!)

पाकिस्तानमधून परत येताच मिका सिंगला देशप्रेम आठवलं, अटारी सीमेवरचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...