Corona Virusला 5G टेक्नॉलॉजी करणार नष्ट, चीन लागला तयारीला

Corona Virusला 5G टेक्नॉलॉजी करणार नष्ट, चीन लागला तयारीला

यात यश मिळालं तर साथीच्या आजारांना रोखता येऊ शकतं असा दावा केला जातोय.

  • Share this:

बिजिंग 20 मार्च : कोरोनावर उपाय सापडत नसल्याने सर्व जग चिंतेत आहे. तर त्याला अटकाव करण्यासाठी नवं नवे प्रयोग केले जात आहेत. औषध क्षेत्रात संशोधन तर सुरुच आहे त्याच बरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीनेही त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यासाठी चीनच्या अनेक कंपन्या सरसावल्या असून त्यांनी प्रयोगही सुरु केले आहे. 5G टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेचा वेग कितीतरी पट जास्त वाढणार आहे. त्याच्यात मदतीने या चीनी कंपन्या प्रयोग करत आहेत. अशा साथीच्या आजारात सर्वाधिक धोका असतो तो संसर्गाचा.

या नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने कुठल्याही चालत्या वस्तूचं तापमान मोजता येऊ शकते. त्याचबरोबर त्याला हात न लावता केवळ मशिनच्या साह्याने रुग्णाच्या शरीराची तपासणीही करता येऊ शकते.  त्याचबरोबर विश्लेषण करणं आणि इतर गोष्टीही करता येतात असा दावा चीनच्या तज्ज्ञांनी केला आहे. यात यश मिळालं तर साथीच्या आजारांना रोखता येऊ शकतं असा दावा केला जातोय.

कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आता युरोपात (Eropue) थैमान घातलं आहे. इटलीत (Italy) चीनपेक्षाही (China) जास्त बळी घेतलेत. जगातील एकूण कोरोनाव्हायरसच्या रुग्णांपैकी 67 टक्के प्रकरणं युरोपात आहेत. त्यामुळे युरोप हा आता कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू झाला आहे.

चीन म्हणाला, 'कोरोना' वुहानचा नव्हे; मग नेमका कुठून आला व्हायरस?

जगभरात कोरोनाव्हायरसचे 1,38,840 अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी 93,396 युरोपात आहेत. इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स हे देश कोरोनाव्हायरने सर्वाधिक प्रभावित आहेत.

हे वाचा - 'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण

कोरोनाव्हायरसच्या मृतांचा सर्वाधिक आकडा आतापर्यंत चीनमध्ये होता. मात्र आता चीनपेक्षा इटलीत सर्वाधिक बळी गेलेत. 24 तासांत 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 3,405 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 3,245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

First published: March 20, 2020, 11:46 PM IST

ताज्या बातम्या