S M L

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती जाधव कुटुंबियांना दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाने पाकिस्तानला चपराक बसली आहे.

Samruddha Bhambure | Updated On: May 10, 2017 08:46 AM IST

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

10 मे : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला  इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने (आयसीजे) स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे जाधव यांच्या घरवापसीच्या भारताच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती जाधव कुटुंबियांना दिली आहे. आयसीजेच्या निकालाने पाकिस्तानला चपराक बसली आहे.

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016मध्ये अटक करण्यात आली होती.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 10 एप्रिलला फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती . या पार्श्वभूमीवर आयसीजेने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना एका पत्राद्वारे या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे कळवलं.

"जाधव भारतीय नौदलात काम करत होते. मात्र ते निवृत्त अधिकारी असून आता त्यांचा भारत सरकारशी थेट संबंध नव्हता ते फक्त भारतीय नागरिक आहेत", अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती.  तसंच, भारताला पाकिस्तानने कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारताने आयसीजेत केला होता.

Loading...
Loading...

आयसीजेच्या या निर्णयामुळे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणणे शक्य होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 08:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close