का पेटली पवार आणि आंबेडकरांमध्ये ठिणगी ?

का पेटली पवार आणि आंबेडकरांमध्ये ठिणगी ?

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये वाद पहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून असाच एक वाद पेटला आहे तो राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि आरपीआय पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये.

  • Share this:

संदीप सोनवलकर

मुंबई, 03 ऑगस्ट : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये वाद पहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून असाच एक वाद पेटला आहे तो राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि आरपीआय पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये. मराठा युवकांनी शरद पवार यांना आता निवृत्त केलं अशी टीका आंबेडकर यांनी केली तर मी आतापर्यंत 9 निवडणुका लढलो आहे, आंबेडकर यात नवीन आहे असा पलटवार शरद पवार यांनी केला. आता या वादाचं खरं कारण आहे ते महाराष्टात होऊ घातलेल्या 2019च्या निवडणुका. या निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक जण आपलं प्याद दामटवत आहे.

खरंतर आतापर्यंत शरद पवार हे आरपीआईचे रामदास आठवले यांचा निवडणुकांसाठी वापर करत होते. पण गेल्या काही निवडणुकांपासून ते भाजपचा हात धरून चालत आल्याचं दिसून आलं. तर मागच्या वेळी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हात मिळवणी केली होती. तर गवई कवाडेबरोबर राष्ट्रवादी होती. आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत आहे तर यात आंबेडकरांची सोबत नको अशी पवारांची इच्छा आहे. तर यावर आंबेडकरांना वाटतं की, काँग्रेस, सीपीआय,सपा आणि बसपा यांच्या महायुतीत जर एनसीपी आली तर ठीक नाहीतर नाही.

खरंतर या सगळ्यात आंबेकरांना शरद पवार भाजपला बाहेरून पाठिंबा देतील असा अंदाज आहे. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र बंदची हाक देत प्रकाश आंबेडकर यांनी आधीच त्यांची ताकद दाखवली आहे. पण आंदोलनामागे काही समाजकंटकी संघटनांचा हात असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. आंबेडकर एक नेते असल्याचं पवारांना मान्यच नाहीये. त्यांच्या मते आंबेडकर फक्त अकोल्याचे नेते आहेत पण तिथेही ते निवडूण येऊ शकत नाहीत असं पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बसपाला महाराष्ट्रात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या विरुद्ध पर्याय देता येईल. यासंबंधी पवार स्वतः मायावती यांना भेटले होते. त्यांनी काँग्रेसलाही हे सांगण्याचा प्रयत्न केला की मायावती यांना भलेही महाराष्ट्रात चांगली जागा मिळाली नाही तरी त्या एकूण 16 लाख मतांनी निवडूण आल्या होत्या. पवारांच्या या चालीमुळे आंबेडकर भारी चिडले होते.

वास्तविक, विदर्भातील 23 विधानसभा आणि मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील दलित मतदारांचे मत 7 ते 14 टक्के आहे. म्हणून पवार यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीएसपीची युती करायची आहे. जेणेकरून कधी संधी मिळालीच तर पंतप्रधान पदासाठी मायावती पवार यांचं नाव पुढे करतील. आता प्रकाश आंबेडकर सीपीआय, सपा, एमआयएम आणि आम आदमी पार्टी यांसह तिसऱ्या महामोर्चाची कवायत करत आहे. पण अजाणतेपणे त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.

First published: August 3, 2018, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading