• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जितेंद्र आव्हाड संतापले...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जितेंद्र आव्हाड संतापले...

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ व राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात कार्यक्रमाच्या स्टेजवरच 'तू तू मै मै' सुरु झाली होती.

  • Share this:
भिवंडी,23 फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील महापोली येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाट्यमय वादावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत मला अंधारात ठेऊन काही करू नका, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी ग्रामीणच्या वतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र अव्हाड यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ व राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात कार्यक्रमाच्या स्टेजवरच 'तू तू मै मै' सुरु झाली होती. सध्या प्रदेश सरचिटणीस पदावर असलेल्या पिसाळांना राज्यात महाआघाडीची सत्ता असल्यामुळे ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाचा मोह असल्याचे समोर आले. सध्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या दशरथ तिवरे यांची व पिसाळांची या पदाच्या मुद्यावरून सध्या तू तू मै मै सुरु झाली आहे. एवढेच नाही तर मंत्री आव्हाड जेव्हा आपले अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आले असता तिवरे यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषण मध्येच थांबवले. स्वतः माईकचा ताबा घेतला व आपली भावना व्यक्त करत पिसाळांवर जाहीर खोचक टीका केली. 'मी विधानसभेत येतो, मग नाय तुला फाडला तर...', शिवसेना आमदाराचं ओपन चॅलेंज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका करीत. दुसऱ्याच्या कार्यक्रमात येऊन घाण करता कशाला, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या पिसाळांवर टीका केली. तर जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना देत नाहीत, तुमच्याकडे जे ऐश्वर्य आले आहे ते कार्यकर्त्यांचे आहे '' अशा तीव्र शब्दात त्यांनी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यावर देखील टीका करत पदांसाठी भांडू नका, असा सल्ला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडवला असेल तर त्याचे नाव गणेश नाईक आहे, अशी टीका त्यांनी नाईकांवर याप्रसंगी केली. राष्ट्रवादी सोडून गेलेले भाजपचे सध्याचे भिवंडी लोकसभा खासदार कपील पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा यांच्यावर देखील त्यांनी याप्रसंगी टीका केली. चौकशीप्रकरणी अडचण वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न, एकनाथ खडसे म्हणतात...
Published by:Sandip Parolekar
First published: