कोल्हापुरात 'पोस्टर' वॉर.. मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद पेटला

कोल्हापुरात 'पोस्टर' वॉर.. मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद पेटला

अभिनेत्री छाया सांगावकर यांनी मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर, 19 नोव्हेंबर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री असलेल्या महिला संचालिकेने विनयभंगाचा केला होता. या प्रकरणातून नुकतीच निर्दोष मुक्तता मिलिंद अष्टेकर यांनी संचालकेसह इतर दोघांचा उल्लेख असलेले पोस्टर चित्रपट महामंडळाच्या दारात उभे केले होते. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी मिलिंद अष्टेकर त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करत त्यांचे पोस्टर फाडून त्यावर पेट्रोल टाकून जाळला. या पोस्टरमुळे महामंडळातील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चित्रपट महामंडळाच्या अंतर्गत राजकारणातून 30 जुलै 2014 ला अभिनेत्री छाया सांगावकर यांनी मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याचा निकाल अलीकडेच म्हणजे 14 ऑक्टोबरला जाहीर झाला आणि त्यामध्ये अष्टेकर यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. निकालाची प्रत मिळाल्यानंतर अॅड. प्रकाश मोरे आणि अष्टेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली. या घटनेविरोधात छाया सांगावकर, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात 25 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच फौजदारी गुन्हाही नोंद केल्याचे सांगितले. महामंडळाची बदनामी करणाऱ्या या तिघांचेही सभासदत्व रद्द करावे, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, हा वाद येथेच थांबला नाही. सोमवारी सकाळी महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयाच्या दारातच या घटनेला कारणीभूत असलेल्या सांगावकर, नलवडे आणि पन्हाळकर या तिघांच्याही छायाचित्रासह निषेध करणारा फलक काही चित्रपट व्यावसायिक आणि कामगारांनी लावला. सांगावकर यांना पुन्हा सदस्य करुन घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचाही निषेध असाही उल्लेख त्या फलकावर होता. ही बाब कळल्यानंतर विरोधातील चित्रपट व्यावसायिकांनी सोमवारी सायंकाळी हा फलक काढून त्यावर पेट्रोल टाकून तिथेच जाळून टाकला.

First Published: Nov 19, 2019 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading