आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलाच्या काकांकडून छळ, विनयभंगाचा प्रयत्न

आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलाच्या काकांकडून छळ, विनयभंगाचा प्रयत्न

कैलाश जाधव आणि प्रीतम जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. कैलाश हा मराठा समाजाच्या असून प्रीतम ही दलित समाजाची आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 21 जून : एका मराठा समाजाच्या मुलाने दलित मुलीशी लग्न केल्याच्या रागातून मुलाच्या चुलत काकाकडून दाम्पत्याचा छळ केला जात असल्याचा आरोप दाम्पत्याकडून करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या सुभाष ठेकडी परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे माणूसकी हाच धर्म असं शिकवत असताना असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे आपला देश खरंच खुल्या विचारांचा झाला आहे का? यावर प्रश्नचिन्ह आहे.

कैलाश जाधव आणि प्रीतम जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. कैलाश हा मराठा समाजाच्या असून प्रीतम ही दलित समाजाची आहे. खालच्या जातीतल्या मुलीशी विवाह केल्याचा वकील असलेल्या काकाला राग होता. त्यामुळे काका अनिल जाधव हे वारंवार जातीवरून बोलत असल्याचा आरोप प्रीतम आणि कैलाश यांनी केला आहे.

दरम्यान, 3 जून रोजी अनिल जाधव आणि पीडित कटुंबामध्ये बाचाबाची झाली. शिवाय अनिल जाधव यांनी प्रीतमचा विनयभंग केल्याची तक्रार प्रीतम यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केल्याने अनिल जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अनिल जाधव हे घरात जातीवाचक बोलत असल्याचे पोलिसांना सांगून सुद्धा त्यांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्याचंही कैलाश जाधव आणि प्रीतम जाधवचं म्हणणं आहे.

या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रशचिन्ह निर्माण झालं आहे. तर 'माझ्यावर केलेल्या आरोपात काहीच तथ्य नसून जमिनीच्या वादातून हा प्रकार सुरू आहे' असं वकील अनिल जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे जातीचा आणि धर्माचा मुद्दा अद्यापही लोकांच्या मनात सलत असल्याचं समोर आलं.

आंतरजातील विवाह केला म्हणून सैराटसारख्या अनेक घटना आपल्या देशात घडत आहे. सिनेमांतून कितीही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तरी घटना कमी होताना काही दिसत नाही. याऊलट जातीय वादामुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हे प्रकार कधी थांबणार हा मोठा प्रश्न आहे.

VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 09:26 PM IST

ताज्या बातम्या