VIDEO : त्याने 10 मिनिटांत इन्स्टाग्राम केलं हॅक, फेसबुकने दिलं 20 लाख रुपयांचं बक्षिस

VIDEO : त्याने 10 मिनिटांत इन्स्टाग्राम केलं हॅक, फेसबुकने दिलं 20 लाख रुपयांचं बक्षिस

इन्स्टाग्राम कसं हॅक करता येतं याचा व्हिडिओ त्यानं शेअर केला. त्यानंतर फेसबूकने त्याला बक्षिस दिलं.

  • Share this:

चेन्नई, 16 जुलै : हॅकिंगच्या दुनियेत फक्त फ्रॉड केले जातात असं नाही तर ते होऊ नयेत यासाठी सिस्टिममधल्या त्रुटी शोधण्याचंही काम केलं जातं. भारतीय हॅकर्स याबाबतीत जगात पुढे आहेत. अनेक टेक कंपन्यांच्या बाउंटी प्रोग्रॅमच्या अंतर्गत सिस्टिमच्या त्रुटी शोधल्या जातात. यातच भारताच्या हॅकरनं इन्स्टाग्राममधील एक असा बग शोधला आहे ज्यामुळं 10 मिनिटात इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करता येतं.

तामिळनाडुतील हॅकर लक्ष्मण मुथैय्या काम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. लक्ष्मणने हॅकिंगचा व्हिडिओ पुरावा म्हणून दिला आहे. त्यानंतर फेसबुकनं त्याला 30 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 20 लाख 55 हजार रुपयांचे बक्षिस दिलं आहे.

लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार हा बग इन्स्टाग्रामच्या पासवर्ड रिकव्हरी सिस्टिममध्ये होता. यामध्ये कोणताही हॅकर पासवर्ड रिसेट करून अकाउंट हॅक करू शकतो. पासवर्ड रिकव्हरीसाठी इन्स्टाग्राम मोबाइल नंबरवर 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवतं. लक्ष्मणने हा बग शोधून टेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या आय़पी अॅड्रेसवरून एक हजार रिक्वेस्ट पाठवल्या.

व्हेरिफिकेशनसाठी 10 लाख कोड ट्राय केल्यानंतर कोणत्याही अकाउंटचा पासवर्ड बदलता येतो. 100 वेगवेगळ्या आय़पी अॅड्रेसवरून रिक्वेस्ट पाठवून अकाउंट हॅक करता येतं. याची माहिती लक्ष्मणने फेसबुकला दिली. लक्ष्मण मुथय्यानं 9 मे 2019 ला फेसबुकला याची कल्पना दिली होती. त्यानंतर 10 जुलैला हा बग फिक्स करण्यात आला.

फरसाण खाणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; होत आहे तुमच्या जीवाशी खेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 02:08 PM IST

ताज्या बातम्या