Elec-widget

नागपूरच्या जखमी 'वाघा'साठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर!

नागपूरच्या जखमी 'वाघा'साठी खास ब्रिटनहून आले डॉक्टर!

शिकाऱ्यांनी फेकलेल्या जाळ्यात 'साहेबराव' अडकला पण जंगलाच्या या राजाने त्यांना चकवा दिला.

  • Share this:

नागपूर 11 ऑक्टोंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच्या पळसगाव येथे शिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकून पायाची तीन बोटे निकामी झालेल्या नऊ वर्षीय 'साहेबराव' या वाघावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आलीय. जखमी झाल्यानंतर त्याच्यावर याआधीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नंतर त्याची जखम चिघळली होती. त्याचा त्याला त्रासही होत होता. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. त्यासाठी खास ब्रिटनहून डॉक्टर आले होते. 'साहेबराव'ला आता आराम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 'साहेबराव'च्या वाघाच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधिवातातून त्याला आराम मिळण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय. त्याला कृत्रिम पायही लावण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वाघाच्या पायाचे मोजमापही घेण्यात आले आहे. पण जोपर्यंत त्याच्या पायाची जखम भरणार नाही तोपर्यंत ही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लग्नासाठी मदत हवीय? तर नवरदेवाला पाठवावा लागेल 'टॉयलेट'सोबत सेल्फी!

शिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात सापडलेल्या पायावर गँगरिनची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. मात्र, काही

महिन्यापासून वाघाच्या पायाचा त्रास वाढल्याने तो मोठ्याने ओरडत होता. लंगडतही होता. पाय पिंजऱ्यात अडकल्याने पायाच्या नसा फाटून त्याला वारंवार जखमा होण्याचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांच्या  लक्षात आलं होतं.

डॉ. सुश्रुत बाभूळकर यांच्या उपस्थितीत डॉ.शिरीष उपाध्ये, डॉ. विनोद धूत, इंग्लडचे डॉ. लिडस आणि डॉ. पीटर जियानौदीस यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया केली. यामुळे वेदनादायक न्यूरोमा आणि संधिवातून आराम मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तब्येतीचा आढावा घेऊन नजीकच्या काळात साहेबराव या वाघाला कृत्रिम अवयव लावण्याचा प्रयत्न आहे.

Loading...

अमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

त्यासाठी लागणारे पायाचे मोजमापही घेण्यात आले आहे. आजची शस्त्रक्रिया सुमारे २५ मिनिटे चालली. वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातली पहिली शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑथपिडिक सर्जन आणि माफसुचे तज्ज्ञ डॉक्टर एकत्र आले आहेत. साहेबरावसाठी डॉ. बाभूळकर यांनी जर्मनीहून एओ फाउंडेशनमार्फत कृत्रिम पाय मागविला आहे. हे फाउंडेशन मानव आणि प्राण्यांचे फ्रॅक्चर ठीक करण्यामध्ये तज्ज्ञ मानले जातात. काही वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर साहेबरावला सिलिकॉनपासून बनविलेला पाय बसवण्यात येणार आहे, जो अगदी खराखुरा वाटेल असंही डॉक्टरांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...