चोरांनी ब्लेडने वार केले तरी मागे नाही हटला चिमुरडा, अशी परत मिळवली सायकल

चोरांनी ब्लेडने वार केले तरी मागे नाही हटला चिमुरडा, अशी परत मिळवली सायकल

चोरांनी दुपारी घराबाहेर असलेली सायकल चोरण्याचा प्रयत्न केला. यावर चिमुरड्याने त्यांचा सामना करून सायकल परतस मिळवली.

  • Share this:

इंदूर, 17 जुलै : हल्लीची मुलं फार हुशार आणि तल्लख असतात याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. भर दिवसा चोरी करण्यासाठी आलेल्या तीन चोरांचा एका चिमुकल्याने मोठ्या हुशारीने आणि हिम्मतीने सामना केला. चोरांनी दुपारी घराबाहेर असलेली सायकल चोरण्याचा प्रयत्न केला. यावर चिमुरड्याने त्यांचा सामना करून सायकल परतस मिळवली. यामध्ये चिमुकला जखमी झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

इंदूरच्या छत्रीपुरा ठाणा क्षेत्रात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. इथे गेल्या काही दिवसांपासून चोराने धिंगाणा घातला आहे. घराबाहेर असलेली सायकल चोरत असताना लहान मुलाला जाग आली आणि तो न घाबरता घराबाहेर आला. त्याने तीन चोरांना जाण्यासाठी सांगितलं आणि सायकल परत देण्याची मागणी केली.

गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी, असे आहेत कठोर नियम

महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद

यामध्ये चिमुरड्याची तीन चोरांसोबत हातापायीसुद्धा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी चिमुरड्याच्या हातावर अनेक वेळा ब्लेडने वार केले आणि त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीदेखील न घाबरता चिमुरड्याने चोरांना मारहाण केली आणि सायकल परत मिळवली. मुलाने मोठ्याने आरडाओरड केली आणि लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोर घाबरले आणि घटनास्थळावरून पळून गेले.

मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस गस्त नसल्यामुळे चोरांची अशी हिम्मत वाढली आहे अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच इथे एक सायकल चोरी गेली होती. रात्रीसुद्धा चोर घरातून सायकल घेऊन जातात. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 17, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या