News18 Lokmat

#IndvsNZ T20 : अतितटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव

तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका खिशात टाकली.

News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2019 10:37 AM IST

#IndvsNZ  T20 : अतितटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव

ऑकलंड, 8 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने दिलेल्या 136 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 20 षटकांत 6 विकेट गमावत पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या सुएझ बेटसने 62 धावा केल्या. तिला सोफि डिव्हाईन (19 धावा) आणि अॅमी सॅथर्टवेटने (23 धावा) साथ दिली. भारताच्या अरुंंधती रेड्डीने जम बसलेल्या सुएझला बाद केल्याने विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, मार्टिन आणि रॉव्ह यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.भारताच्या राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर पूनम यादव आणि मानसी जोशीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मिताली राजच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताला 20 षटकात 6 बाद 135 धावांपर्यंत मजल मारता आली. जेमायमा रॉड्रीग्जने सर्वाधिक 72 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. सलामीची फलंदाज प्रिया पुनिया 4 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमायमा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. स्मृती 36 धावांवर बाद झाली. या दोघींव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका खिशात टाकली. याआधी एकदिवसीय मालिका जिंकलेल्या भारतीय संघाला टी20त मात्र यजमानांना पराभूत करता आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 10:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...