Elec-widget

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर इंदुरीकरांचं कीर्तन, म्हणे 'मी आताच मुख्यमंत्री आहे'

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर इंदुरीकरांचं कीर्तन, म्हणे 'मी आताच मुख्यमंत्री आहे'

पुरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेलो तर माध्यमांनी विनाकारण वावड्या उठवल्याचं इंदुरीकर म्हणाले आहेत.

  • Share this:

हरीश दिमोटे, प्रतिनिधी

संगमनेर, 18 सप्टेंबर : संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर महाराजांनी दिली आहे. पुरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेलो तर माध्यमांनी विनाकारण वावड्या उठवल्याचं इंदुरीकर म्हणाले आहेत. मी आताच मुख्यमंत्री आहे मला उभं राहून काय करायचं? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

गेल्या शुक्रवारी ते सहजच म्हणून मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर काय गेले आणि लागलीच त्यांच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली. एवढंच नाहीतर ते संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढणार असल्याचंही काही प्रसारमाध्यमांनी जाहीर करून टाकलं. त्यावर अखेर वैतागून इंदुरीकर महाराजांनी हा असा इरसाल खुलासा केला.

संगमनेर गावातील कसारे गावच्या किर्तनात त्यांनी हा खुलासा केला आहे. आपण राजकारणात उतरणार नसल्याचं सांगतानाच हे महाशय मीडियावरही घसरायला विसरले नाहीत. पण मूळ मुद्दा असा आहे की, महाराजांना खरंच राजकारणात उतरायचं नव्हतं तर त्यांनी त्याचवेळी खुलासा करणं अपेक्षित होतं. पण प्रसिद्धीची मजा घेऊन झाल्यावर मगच यथावकाश या कॉमेडी किर्तनकाराने हा खुलासा केला आहे. तो देखील किर्तनातूनच.

इतर बातम्या - PM मोदींना भेटण्यापूर्वी पत्नी जशोदाबेन यांची ममतांसोबत पडली गाठ आणि...!

Loading...

इंदुरीकरांना प्रसिद्धीत राहायला तर आवडतं. त्याद्वारे होणारी निगेटिव्ह प्रसिद्धी मात्र नको. पण कायम काळासोबत अपडेट राहणाऱ्या या कॉमेडी किर्तनाकाराचे व्हि़डिओ टिकटॉकवरही नेहमीच ट्रेंडिगला नंबर वन असतात. पण याच नादात ते अनेकदा नकळतपणे महिलांचा अपमान करून जातात याचंही त्यांना कधीकधी भान राहत नाही. त्यावर मात्र, ते कधीच खुलासा देताना दिसत नाही. असो यापुढे ते याबाबत नक्कीच काळजी घेतील.

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 10:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...