आत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर

भय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2018 06:29 PM IST

आत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर

इंदूर,ता.12 जून : भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळं देशभर खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमक कारण काय हे गुढ मात्र अजुनही कायम आहे. भय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

मध्यप्रदेशच्या गुप्तचर विभागाचे पोलिस महानिरिक्षक मकरंद देऊस्कर यांनी माहिती देताना सांगितलं की इंदूर मधल्या 'सिल्व्हर स्प्रिंग' या निवासस्थनामधून सुसाईड नोट आणि पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून लायसन्स असलेलं पिस्तुल होतं. अशी माहितीही त्यांनी दिली.

आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळं ते अतिशय तणावात होते अशी माहिती असल्यानं आत्महत्येची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांचे कुटूंबिय आणि जवळचे सहकारी यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही देऊस्कर यांनी दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...