ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे 17 रुग्णांचा अंत

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे 17 रुग्णांचा अंत

मध्य प्रदेशातील रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने १7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

  • Share this:

23 जून : मध्य प्रदेशातील रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने १7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे १7 रुग्ण अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत मृत पावल्याने एकच खळबळ माजली.

महाराजा यशवंतराव रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा मध्यरात्री ३ ते ४ दरम्यान खंडित झाला. यामागील कारण अद्याप समोर आले नसून, १५ मिनिटांसाठी खंडित झालेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे १7 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

. मात्र इतक्या मोठ्या रुग्णालयात अशा घटना घडतच असतात, असा बेजबाबदार पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी दिले असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading