आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर 3-1ने मात

आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर 3-1ने मात

आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केलाय. ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं हा विजय मिळवला.

  • Share this:

ढाका, 15 ऑक्टोबर : आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केलाय. ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं हा विजय मिळवला. चिंगलेसाना सिंगनं १७ व्या मिनीटाला पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. रमणदीप सिंगनं ४४ व्या मिनीटाला दुसरा गोल करत भारताची आघाडी आणखी भक्कम केली. त्यानंतर लागलीच ४५ मीनिटाला हरमणप्रीत सिंगनं तिसरा गोल करत. भारताचा विजय निश्चित केला. पाकिस्तानची टीम पूर्णपणे दबावात खेळत होती. अली शाननं ४८व्या मीनिटाला पाकिस्तानकडून एकमेव गोल केला. या विजयाबरोबरच भारतानं शेवटच्या चार संघात आपली जागा पक्की केलीये. पाकिस्तान विरुद्ध हा भारताचा सलग पाचवा विजय होता.

First published: October 15, 2017, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading