बेतिया 18 जुलै: नेपाळने (Nepal) भारतासोबतचा वाद आणखी वाढवला आहे. बिहार सीमेवरच्या सीता गुंफा मंदिरावर आता दावा केला आहे. नेपाळने बिहार-नेपाळ सीमेवरच्या (India-Nepal border) सीता गुंफा मंदिराजवळचा एक खांब काढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी याची माहिती प्रशासनाला दिली आहे. ही माहिती मिळताच सुरक्षा दलांचे जवान आणि स्थानिक प्रशासनिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारताविरोधात भूमिका घेतल्यानंतर सीमेवरच्या नेपाळी नागरिकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे भगवान श्रीराम यांच्या संदर्भातल्या ठिकाणांवर नेपाळी नागरीक दावा करत आहेत. त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्री राम हे नेपाळचे असून भारताचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य शर्मा यांनी केलं होतं. या आधीही नेपाळने भारताचा काही भाग हा आपल्या नकाशात दाखवून त्याला संसदेची मंजुरीही घेतली होती. त्यानंतर त्यावर भारताने आपला तीव्र विरोध व्यक्त केला होता.
नेपाळला चीनची फूस असून त्या बळावर पंतप्रधान ओली हे भारताशी अकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
VIDEO: भारत पाकिस्तान सीमेवर जवानांचा भांगडा, जोश पाहून सेहवागचंही बल्ले बल्ले!
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान ओली यांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. भारत आपल्यालाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी षडयंत्र करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.