VIDEO...तर हवेतच झाली असती विमानांची टक्कर, बंगळुरूच्या आकाशातला थरार!

VIDEO...तर हवेतच झाली असती विमानांची टक्कर, बंगळुरूच्या आकाशातला थरार!

बंगळुरूच्या आकाशात इंडिगोच्या दोन विमानांची धडक थोडक्यात टळल्याची माहिती समोर आलीय. मोठी दुर्घटना टळल्याने दोन्ही विमानातले एकूण 328 प्रवासी थोडक्यात बचावले.

  • Share this:

बंगळुरू, ता.12 जुलै : बंगळुरूच्या आकाशात इंडिगोच्या दोन विमानांची धडक थोडक्यात टळल्याची माहिती समोर आलीय. मोठी दुर्घटना टळल्याने दोन्ही विमानातले एकूण 328 प्रवासी मृत्यूच्या कचाट्यातून थोडक्यात बचावलेत. अपघातातून बचावलेली दोन्ही विमानं इंडिगो कंपनीची होती. बंगळुरूच्या आकाशात उडताना दोन्ही विमानं एकमेकांसमोर आली. या दोन्ही विमानामधली उंची होती फक्त 60 मीटर. मात्र दैव बलवत्तर म्हणून हा अपघात टळला आणि ही दोन्ही विमान आणि त्यातले प्रवासी थोडक्यात बचावले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन बोर्डानं या घटनेची चौकशी सुरू केल्याचीही माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

मंगळवारी बंगळुरु विमानतळावरुन उड्डाणानंतर इंडिगोच्या 6E 779 कोईंबतूर-हैदराबाद आणि 6E6505 बेंगळुरु कोच्ची या दोन विमानांची हवेत टक्कर होता होता वाचली. 6E779 या हैदराबादला जाणाऱ्या विमानाला 36,000 फुट ऊंचीवर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तर, कोच्चिला जाणाऱ्या 6E6505 या विमानाला 28,000 हजार फुट ऊंचीवर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण तांत्रिक चुकिमुळे विमानं जवळ आली. हे लक्षात आल्यावर दोनही वैमानिकांना कंट्रोल रूमने अलर्ट केलं आणि एक मोठा अपघात टळला.

हेही वाचा...

2019 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा आहे 'मास्टर प्लान'

आव्हाडांचं 'नाचता येईना...'अन् भगवत गीतेचा श्लोकही म्हणता येईना !

मुजोर हॉस्पिटल्सना कोर्टाचा दणका, पैशासाठी अडवणूक केल्यास दाखल होणार गुन्हा

ज्येष्ठ कवी मधुकर जोशी घराच्या शोधात

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 06:39 PM IST

ताज्या बातम्या