Home /News /news /

Miniature Museum Pune : पुण्यात आहे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली नोंद

Miniature Museum Pune : पुण्यात आहे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली नोंद

title=

रवी जोशी यांच्या मालकीचे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची उभारणी 1998 साली करण्यात आली. रवी जोशी यांच्या वडिलांनी ही उभारणी केली होती. या संग्रहालयाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेदेखील (Limca Book of Records) घेतली आहे.

  पुणे, 21 मे : भारतात अनेक संग्रहालये (Museums in India) आहेत. प्राणी संग्रहालये (Zoo Parks) आहेत. मोठमोठी ग्रंथालये (Libraries in India) आहेत. यातच आज आपण भारतातील पहिले मिनिएचर संग्रहालये काय आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, असे म्हटलं जातं. याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात हे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय (India's First Miniature Museum) आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल - रवी जोशी यांच्या मालकीचे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची उभारणी 1998 साली करण्यात आली. रवी जोशी यांच्या वडिलांनी ही उभारणी केली होती. भारतातील हे पहिलंच मिनिएचर संग्रहालय आहे. या संग्रहालयाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेदेखील (Limca Book of Records) घेतली आहे. संग्रहालयातील वस्तू या मूळ स्वरुपाच्या वस्तूंपेक्षा 85 -87 पटीने लहान आहेत. एकूण 18 मीटर लांबीच्या व्यासामध्ये हे मिनिएचर शहर वसवले आहे. तब्बल 25 वर्षांपासून लोक येथे भेट देतात -  या शहरांमध्ये आपल्याला धावत्या रेल्वे, बसेस, सर्कस, पवनचक्की, कारंजे विविध हॉटेल्स, मनोरंजनाची ठिकाणे, बस स्थानके, रेल्वेस्थानके, अशाप्रकारे एक छोटंसं शहरच या संग्रहालयाच्या माध्यमातून वसवण्यात आलंय. पुण्यातील करिष्मा सोसायटी येथे 'जोशीज म्युझियम' या नावाने हे संग्रहालय आहे. मागील तब्बल 25 वर्षांपासून येथे अनेक आबालवृद्ध भेट देतात. हेही वाचा - 12वी उत्तीर्णांनो, कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल 1431 जागा रिक्त; इथे करा अप्लाय
  युरोपीय देशांमध्ये हा प्रकार अधिक -
  या म्युझियममध्ये एक कंट्रोल रूम असून येथे कॉमेंट्री करून पूर्ण संग्रहालयाचा देखावा साकारला जातो. हा संपूर्णपणे हलता देखावा आहे. मिनिएचर संग्रहातील हा देखावा बघण्यासाठी अनेक आबालवृद्ध येत असतात. अशी संग्रहालये युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. मात्र, आशियामध्ये आणि तसेच भारतामध्ये अशी संग्रहालये फारच क्वचित पाहायला मिळतात. तर अशाप्रकारे हे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय आहे.
  First published:

  Tags: India, Pune, Record

  पुढील बातम्या