मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Sanjeevani चे जनजागृतीचे व भारतामध्ये लसीकरणासाठी मदतीचे कार्य चालूच

Sanjeevani चे जनजागृतीचे व भारतामध्ये लसीकरणासाठी मदतीचे कार्य चालूच

लसीकरणाविषयीचा संकोच दूर करणे, लसीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे आणि अतिदुर्गम भागांतील लोकांसाठी कोविड लसी सहज उपलब्ध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

लसीकरणाविषयीचा संकोच दूर करणे, लसीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे आणि अतिदुर्गम भागांतील लोकांसाठी कोविड लसी सहज उपलब्ध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

लसीकरणाविषयीचा संकोच दूर करणे, लसीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे आणि अतिदुर्गम भागांतील लोकांसाठी कोविड लसी सहज उपलब्ध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

  187 दशलक्षहून अधिक रुग्ण व जवळपास 4 दशलक्षपेक्षा अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या कोविड-19 चा जगभरात उद्रेक झाला आहे. या रोगाचे 30 दशलक्ष रुग्ण आणि 4.1 लाख मृत्यू लक्षात घेता भारत याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सारं जग कोविड-19 वरील उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असताना, या लसीने या भयानक संसर्गापासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी अनेकांना आशेचा किरण दाखवला आहे.

  भारताने आपला लसीकरण कार्यक्रम दि. 16 जानेवारी 2021 रोजी सुरू केला आणि दिल्या गेलेल्या लसींच्या बाबतीत सध्या भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. लसींची संख्या खूप जास्त असली तरीही, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता 1.38 लाख म्हणजेच केवळ 22.3% लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 5.52% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ही आकडेवारीसुद्धा प्रामुख्याने मुंबई व दिल्लीसारख्या महानगरांमधील लोकसंख्येमध्ये जास्त आहे तर भारताच्या ग्रामीण व आदिवासी भागात राहणाऱ्या 65% हून अधिक लोकांचे आतापर्यंतचे प्रमाण कमी आहे. लसीकरणाचा वेग मंदावण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यामधील प्रमुख कारण लसीविषयीचा संकोच हे आहे.

  भारतामध्ये कोविड-19 लसीकरण कार्यक्रमासाठी खूप सारे स्त्रोत उपलब्ध आहेत पण तरीही लसीविषयीच्या निराधार माहिती आणि दंतकथा समुदायांमध्ये प्रचलित आहेत. तांत्रिक संसाधने आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या लोकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहचवण्यासाठी, Federal Bank ने Network 18, युनायटेड वे मुंबई आणि Apollo Hospitals च्या संयुक्त विद्यमाने Sanjeevani- A shot of life (संजीवनी- अ शॉट ऑफ लाईफ) हा प्रकल्प सुरू केला. लसीकरणाविषयीचा संकोच दूर करणे, लसीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे आणि अतिदुर्गम भागांतील लोकांसाठी कोविड लसी सहज उपलब्ध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प सध्या देशातील अमृतसर, दक्षिण कन्नड, गुंटूर, इंदौर आणि नाशिक या 5 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असून 1000 गावांमधील 5 लाखांहून अधिक लोक हे त्यांचे लक्ष्य आहे. 7 एप्रिल 2021 रोजी, जागतिक आरोग्य दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही मोहीम आजवर सार्वजनिक जनजागृती उपक्रम आणि एकास-एक पद्धतीने आरोग्यविषयक तपासणीच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहचली आहे. 10735 लोकांना Cowin पोर्टलवर लसीसाठी नोंदणी करण्यासाठी मदत केली गेली आणि 4304 लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ही मोहीम आणि प्रत्यक्षपणे कार्य करणारी टीम लोकांना लस टोचून घेण्यासाठी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असली तरीही तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या भागांमध्ये लसीविषयी संकोच आढळून येतो. चुकीच्या माहितीमुळे अनेक लोक या टीममधील लोकांशी संवाद साधण्यास तयार होत नाहीत आणि लस टोचून घेण्यासही तयार होत नाहीत.

  तरीही या मोहिमेने प्रगती केली आहे, अनेक यशोगाथा निर्माण झाल्या आहेत एक महत्त्वाची शिकवण म्हणजे लसीविषयीचा संकोच दूर करण्यासाठी सुयोग्य संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे. तथ्य जाणून घेण्याच्या उद्देशाने टीमशी संवाद साधलेल्या बऱ्याच ठिकाणच्या लोकांनी लस टोचून घेतली आहे. या टीमने अंगणवाडी सेविका, ASHA (आशा) कार्यकर्त्या, यांसारख्या सरकारी कार्यकर्त्यांचा खूप प्रमाणात पाठींबा मिळवला आहे आणि लोकांना या मोहिमेचे महत्त्व समजण्यास मदत केली आहे.

  Sanjeevani- A shot of life (संजीवनी- अ शॉट ऑफ लाईफ) या मोहिमेने अशा देशव्यापी कार्यक्रमांदरम्यानच्या संवादाचे महत्त्व आणि लोकांच्या शंका दूर करू शकणाऱ्या आणि त्यांना चुकीच्या माहितीला बळी पडण्यापासून वाचवणाऱ्या प्रत्यक्ष कार्यकर्त्यांची आवश्यकता प्रकाशात आणली आहे.

  लसींविषयीचा संकोच दूर करणे किंवा लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणे तर महत्त्वाचे आहेच पण लसीकरण केंद्रे ही तेथे येणाऱ्या लोकांसाठी संसर्गाचे साधन न बनता त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी स्वच्छता, शुद्धता आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत ही केंद्रे अत्यंत दक्ष असणे आवश्यक आहे. ही Sanjeevani मोहीम या 5 जिल्ह्यांमधील 100 केंद्रांमध्ये कर्मचारी आणि लाभार्थी या दोहोंच्या सुरक्षेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवून या पैलूवरही काम करत आहे. आजपर्यंत, दक्षिण कन्नड तालुक्यातील 18 केंद्रांना मास्क्स, सॅनिटायझर्स, स्वच्छतेसाठीची सामग्री आणि बरेच काही पुरवले आहे.

  या मोहिमेतील उपक्रमांदरम्यान घडलेल्या अनेक सकारात्मक घटनांमुळे कोविड लसीच्या विरोधातील समजांचे निराकरण होण्यास मदत झाली. अशाच घटनांपैकी एक म्हणजे अमृतसरमधील बल्लारवाल या गावातील जसकरण आणि तिच्या कुटुंबावर त्या समुदायाकडून लस न घेण्यासाठी व प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात न येण्यासाठी दबाव आणला जात होता. पण टीमने त्यांच्या शेजाऱ्यांच्या ठोस भूमिका घेऊन त्यांचे लसीकरण केले. जसकरणने एक आदर्श घालून दिला, त्यामुळे समुदायातील इतरांनीही लसी घेतल्या. टीमला तिचा अभिमान वाटतो.

  आणखी एका घटनेने स्थानिक कार्यकर्ते समुदायाच्या दृष्टीकोनावर कसा प्रभाव पाडतात हे अधोरेखित केले. विजया राणी ही आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील 8 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव असलेली ASHA(आशा) कार्यकर्ती आहे. Sanjeevani Gadi च्या मदतीने आणि Sanjeevani टीमच्या सहाय्याने ती आघाडीवर कार्यरत होती. ती लस घेण्याची इच्छा नसलेल्या समुदायातील सदस्यांची मानसिकता बदलू शकली. ती टीमला आजूबाजूच्या गावांमधील ASHA(आशा)शी जोडू शकत होती आणि तेथे टीम जनजागृतीचे कार्यक्रम करू शकत होती.

  पुढचा टप्पा म्हणून, ही मोहीम जोर धरते आहे आणि अधिकाधिक स्थानिक कार्यकर्ते या चळवळीत सहभागी होत आहेत, याची व्याप्तीही जलद गतीने वाढते आहे. आता टीम जास्तीत जास्त लोक लस घेतील आणि येऊ घातलेल्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोणतेही नुकसान टाळतील यावर लक्ष्य केंद्रित करीत आहे. आणखी लसीकरण केंद्रे लोकांना सेवा देण्यासाठी आणि या जिल्ह्यांमधील संपूर्ण लसीकरणाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम बनवली जातील.

  डॉ. शैलेश वागळे, व्यवस्थापक,

  कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट, युनायटेड वे मुंबई

  First published:
  top videos