नवी दिल्ली, 11 मे : देशात विविध मार्गांवर धावणाऱ्या शताब्दी, राजधानी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये लेडिज स्पेशल आणि दिव्यांग स्पेशल डबे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सद्याच्या घडील या प्रत्येक गाड्यांमध्ये दोन अपग्रेडेड पॉवर कार (कोच) आहेत. त्यापैकी एक काढून त्याठिकाणी लेडिस आणि दिव्य़ांग स्पेशल डबा लावला जाणार आहे.
प्रीमियम गाड्यांमधील दोन पावर कारच्या माध्यमातून संपूर्ण गाडीला विद्युत पुरवठा केला जातो. वास्तविक पाहता एकाच पावर कोचद्वारे तो केला जातो आणि दुसरा पावर कोच हा बॅकअपसाठी वापरला जातो. मात्र, नव्याने लावण्यात येणाऱ्या अपग्रेडेड पावर कारमध्ये फुटबोर्डच्या खालच्या भागात बॅकअप लावलं जाणार असल्यामुळे दुसऱ्या पावर कोचची गरज पडणार नाही.
11,000 रुपयांनी स्वस्त मिळताहेत Samsungचे ‘हे’ स्मार्टफोन; फक्त थोडेच दिवस मिळणार सवलत
राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम गाड्यांना यापुढे विद्युत पुरवठा करणारा एकच पॉवर कोच लागणार असून, दुसऱ्या पावर कोचच्या ठिकाणी एक नॉन-एसी कोच लावला जाणार आहे. ही सुविधा महिला आणि दिव्यांगांसाठी सोयिस्कर ठरणार असून, या नॉन-एसी कोचचं प्रवास भाडंसुद्धा कमी राहणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यानी स्पष्ट केलं आहे.