मुंबई, १९ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि राजकुमार राव लवकरच 'मेंटल है क्या' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं. पोस्टर प्रदर्शनापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. पोस्टरवर सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होणार हे कळतं. सर्वकाही सुरळीत झालं तर हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होईल. मात्र दरम्यान हा सिनेमा आता वादात अडकला आहे. ‘इंडियन सायकॅट्रिक सोसायटी’ने सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. या सोसायटीकडून सिनेमाच्या निर्मात्यांना एक पत्रक लिहून सिनेमाचं नाव बदलण्याची आणि प्रदर्शित झालेले पोस्टर मागे घेण्याची मागणी केली आहे.
Indian Psychiatric Society has officially now asked an explanation for the posters and how the movie is choosing to symbolically represent mental illness. This is a huge step. pic.twitter.com/aRtWBj27zb
— Sonali Gupta (@guptasonali) April 19, 2019
इंडियन सायकॅट्रिक सोसायटीने आपल्या पत्रकात लिहिलं की, ‘सिनेमाच्या नावाचा आम्ही विरोध करतो. मानसिकरुग्णांवर हा अन्याय असून त्यांच्यासोबत भेदभाव करण्यासारखं आहे. तसेच हा त्यांचा अपमानही आहे. त्यामुळे सिनेमाचं नाव तातडीने बदलण्यात यावं.’
अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी सोशल मीडियावर यासंदर्भात अभियान सुरू केलं आहे. प्रकाश कोवेलामुडी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या मेंटल है क्या सिनेमाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स आणि कर्मा मीडिया अँड एण्टरटेनमेन्टने केली आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार दोघंही दिस आहेत. दोघांनी आपल्या जीभेने रेजर ब्लेड पकडलेलं दिसत आहे.
VIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा