मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Republic day 2020: राष्ट्रपती म्हणाले, संघर्ष करणाऱ्यांनी गांधींचा 'अहिंसेचा मंत्र' लक्षात ठेवावा

Republic day 2020: राष्ट्रपती म्हणाले, संघर्ष करणाऱ्यांनी गांधींचा 'अहिंसेचा मंत्र' लक्षात ठेवावा

लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघाची भूमिका महत्त्वाची आहे.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघाची भूमिका महत्त्वाची आहे.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघाची भूमिका महत्त्वाची आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

नवी दिल्ली, 25 जानेवारी: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)यांनी गणतंत्र दिनाच्या (Republic day) पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. राष्ट्रपतींनी यावेळी देशातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या सर्वांगिन विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघाची भूमिका महत्त्वाची आहे. संघर्ष करणाऱ्यांनी विशेषत: युवकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा (Gandhi Ji) अहिंसेचा संदेश संदेश लक्षात ठेवावा. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबर देशाच्या कल्याणासाठी एकजुटीने पुढे जायला हवे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला, सौभाग्य आणि आयुष्मान योजनेचा (Ayushman Scheme) आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, सहा दशकांपूर्वी आपले संविधान लागू झाले. देशातील जनतेनेच सरकारच्या अभियानांना 'जनअभियाना'चे रूप दिल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. राष्ट्रविकासात महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता कायम आहे. सत्य आणि अहिंसा हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश आजच्या परिस्थिती गरजेचा झाला आहे. कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी विशेषतः तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे. जो मानवी मूल्यांसाठी सर्वात मोठी भेट आहे. देशाच्या विकासासाठी सक्षम अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने देशातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पाऊले टाकली आहेत. संविधानाने आपल्याला लोकशाही अधिकार दिले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.

First published: