वॉशिंग्टन : भारतीय वंशाची नताशा पेरी (Natasha Peri) ही विद्यार्थिंनी जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असल्याचे गिफ्टेड एज्युकेशन प्रोग्रामने (Gifted Education Programme) जाहीर केलं आहे. अमेरिका (America) येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमामध्ये यशस्वी झालेली नताशा ही 11 वर्षांची असून ती न्यू जर्सी येथील थेल्मा एल सँडमायर एलिमेंट्री स्कूल येथील विद्यार्थिनी आहे. नताशाने SAT, ACT आणि इतर परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला. या परीक्षांचे आयोजन जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) यांनी टॅलेंट सर्च मोहिमेअंतर्गत केलं होतं.
नताशा पेरी हिला डूडलिंग (Doodling) आणि जेआरआर टॉल्किनच्या कांदबऱ्या वाचनाची आवड आहे. जॉन हॉपकिन्स सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या टॅलेंट सर्च स्पर्धेमध्ये (Talent Search Exam) ८४ देशांतील १९ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी २० टक्के मुलांची निवड हाय ऑनर अवॉर्डसाठी (High Honour Award) करण्यात आली होती. त्यामध्ये नताशाचा समावेश होता. पीटीआयशी बोलताना पेरी म्हणाली, ‘माझी या पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे अधिक चांगलं काम करून दाखवण्याची मला प्रेरणा मिळाली.
हे वाचा - Explainer: बोर्डाच्या परीक्षेत नेहमी मुलीच का ठरतात अव्वल? इथे मिळेल उत्तर
पीटीआयच्या वृत्तानुसार या टॅलेंट सर्च स्पर्धेमध्ये जगभरातील ८४ देशांमधील १९ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी उन्हाळ्यात ही परीक्षा घेण्यात आली. पेरी पाचवीमध्ये असताना तिने या स्पर्धेत भाग घेतला होता. बोलणं आणि क्वान्टिटेटिव विभागात (Quantitative Exam) पेरीला सर्वांत चांगले गुण मिळाले होते. तो निकाल स्पर्धेतील निकषांनुसार ग्रेड-८ च्या ९० टक्क्यांच्या गृहित धरण्यात आला.
बाल्टीमोर येथील जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (Center for talented Youth) हे जगभरातील हुशार विद्यार्थ्यी शोधण्यासाठी ग्रेड स्तरीय चाचणी परीक्षा घेते. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वास्तविक शैक्षणिक क्षमता समजतात. या परीक्षेत भारतीय वंशाच्या नताशा पेरी हिची कामगिरी उत्कृष्ट ठरली. जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व्हर्जिनिया रोच विद्यार्थ्यांच्या निवडीवर बोलताना म्हणाल्या, ‘या विद्यार्थ्यांसोबत सेलिब्रेशन करताना आम्हाला आनंद होतोय. गेल्या एका वर्षात जे सामान्य होतं तेही शिकण्याची या विद्यार्थ्यांना जिज्ञासा होती. आम्ही हायस्कूल, कॉलेज आणि त्यापुढील शिक्षणाच्या क्षेत्रातील बुद्धिवान विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सदैव तयार आहोत.’ भारतीय वंशाच्या नताशाने या स्पर्धेत चांगले गुण मिळवत पुरस्कारास ती पात्र ठरली आहे ही भारतीयांच्या दृष्टिने अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय वंशाचे अनेक विद्यार्थी अमेरिकेतील अनेक शैक्षणिक स्पर्धांत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत असतात. आता नताशाचाही या विद्यार्थ्यांच्या नावांत समावेश झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.