नवी दिल्ली 8 जुलै: देशातल्या सार्वजनि क्षेत्रातली सर्वात मोठी तेल कंपनी असलणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने लॉकडाऊन संपल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने तब्बल1.04 लाख कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून येणाऱ्या काळात त्यामुळे हजारो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या योजनांमुळे इंधनाची मागणी वाढेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2020-21 या वर्षात कंपनी 26,143 कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्र सरकारनेही या कंपनीला गुंतवणूक वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. खर्च वाढला तर वस्तूंना मागणी वाढेल, उत्पादन वाढेलल, त्यामुळे बाजारात पैसे येतील आणि बाजारात पैसे आले की अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर येण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कंपनीने गेल्या काही दिवसांमध्ये 336 योजनांवर कामही सुरू केलं आहे. केंद्र सरकारनेही अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही लाख कोटींची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पायाभूत सुविधा, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल विश्व अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंवणूक करणार असून या क्षेत्रात विदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहनही मिळण्याची शक्यता आहे.
Lockdownमुळे दोन महिने घर होतं बंद, दार उघडताच त्या दोघांना पाहून मालक हादरला
कोरोनामुळे देशाच्या आणि सर्वच जगाच्याच अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च होणार हे लक्षात घेऊन त्या दृष्टिनेही सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
भारताच्या दणक्याने घाबरला चीन, गलवान नंतर आता ‘या’ भागातूनही हटवलं सैन्य
लोककल्याणांच्या योजनांवरही प्रचंड प्रमाणत निधी खर्च होत असल्याने अनेक योजनांना कात्री लावावी लागत आहे.