'सीएनएन न्यूज 18'चा मानाचा 'इंडियन ऑफ द इयर' पुरस्कार विराट कोहलीला प्रदान

'सीएनएन न्यूज 18'चा मानाचा 'इंडियन ऑफ द इयर' पुरस्कार विराट कोहलीला प्रदान

'सीएनएन न्यूज 18' नेटवर्कचा मानाचा 'इंडियन ऑफ द इयर 2017 ' पुरस्कार यंदा क्रिकेटर विराट कोहली याला प्रदान करण्यात आलाय. तर यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिला इंडियन ऑफ द इयर स्पेशल अचिव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

  • Share this:

30 नोव्हेंबर, नवी दिल्ली : 'सीएनएन न्यूज 18' नेटवर्कचा मानाचा 'इंडियन ऑफ द इयर 2017 ' पुरस्कार यंदा क्रिकेटर विराट कोहली याला प्रदान करण्यात आलाय. तर यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिला इंडियन ऑफ द इयर स्पेशल अचिव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. बाहुबली सिनेमालाही याच कॅटगरीत सन्मानित करण्यात आलय. कलाक्षेत्रात न्यूटन फेम अभिनेता राजकुमार राव याला प्रदान करण्यात आलाय.

क्रीडा प्रकारात किदाम्बी श्रीकांत यांनी विशेष पुरस्कार पटकावलाय तर बिझनेस कॅटगिरीत पंतजलीचे आचार्य बालकृष्णन विजेता ठरले तर समाज सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अफरोज शाह यांना इंडियन ऑफ इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यांनी जूहू बिच स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबवल्याबद्दल त्यांना या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

बिझनेस आणि सीएसआर या कॅटगरीमध्ये अदर पुनावाला यांनाही सन्मानित करण्यात आलंय. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना स्पेशल अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

 

 

First published: November 30, 2017, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading