आता शत्रूची खैर नाही! भारतीय नौदलाच्या सेवेत पाणबुडी 'INS खांदेरी' दाखल

आता शत्रूची खैर नाही! भारतीय नौदलाच्या सेवेत पाणबुडी 'INS खांदेरी' दाखल

भारतीय नौदलाच्या पाणबुडी आयएनएस खांदेरी (आयएनएस खांदेरी) चं काम पूर्ण झाले आहे. आता ती देशासाठी आपली सेवा देण्यास तयार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज भारतीय नौदलाच्या सेवेत INS खांदेरी ही पाणबुडी दाखल होणार आहे. तर भारतातील सर्वाधीक मोठी सुकी गोदीदेखील आजच नौदलाच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. या सुकी गोदीत नौदलाची अजस्त्र अशी INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका तसंच इतरही युद्धनौकांची डागडूजी करता येणार आहे. त्यासाठी थेट समुद्रातच बांधकाम करून ही सुकी गोदी बांधण्यात आली आहे. INS खांदेरी ही स्काँर्पियन वर्गातील दूसरी पाणबुडी आहे. जीच्या अचूक प्रहार क्षमतेमुळे नौदलाची खोल समुद्रातील ताकत वाढणार आहे. त्यामुळे शत्रूची आता काही खैर नाही.

भारतीय नौदलाच्या पाणबुडी आयएनएस खांदेरी (आयएनएस खांदेरी) चं काम पूर्ण झाले आहे. आता ती देशासाठी आपली सेवा देण्यास तयार आहेत. याच्या बांधकामाला पूर्ण 10 वर्षे लागली आहेत. खांदेरीला तयार करण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. ज्यामध्ये अभियंत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हे समुद्रात 350 मीटर खोलीवर डुबकी लावण्यास सक्षम आहे. चला जाणून घेऊया याच्या खास बाबी?

12 हजार किलोमीटर जाण्यासाठी सक्षम

आयएनएस खांदेरी समुद्रात पूर्ण 45 दिवस 12 हजार किमीचा प्रवास करण्यास सक्षम आहे. यापूर्वी कलवरी स्कॉर्पीन वर्गातील पहिली पाणबुडी होती. यानंतर आयएनएस खांदेरीचं बांधकाम सुरू झालं. भारतीय नौदल गेल्या काही वर्षांपासून आयएनएस कलवरी वापरत आहे. आयएनएस खांदेरी ही त्याच्या शक्तिशाली आणि अत्याधुनिक पाणबुडीची पुढची पिढी आहे.

इतर बातम्या - राजीनाम्यानंतर पवारांची पत्रकार परिषदही झाली पण अजित पवार आहेत कुठे?

नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी विना आवाज चालते

आयएनएस खांदेरीची लांबी सुमारे 67.5 मीटर आहे. त्याची रुंदी 12.3 मीटर आहे. हे समुद्रातील 350 मीटर खोलीवर डुबकी लावण्यास सक्षम आहे. तसंच, ते पाण्याखाली पूर्णपणे शांत राहते. समुद्राच्या पृष्ठभागावरुन तिची कोणतीही हालचाल जाणवत नाही. आयएनएस खांदेरी त्याच्या तळापासून 12 हजार किमी अंतरावर खोल समुद्रात चालू शकते.

इतर बातम्या - राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...; पवारांचा उदयनराजेंना टोला!

काय आहे खांदेरीचा वेग?

खांदेरी पाण्यात सुमारे 20 मैल आणि पाण्याच्या वरती 11 मैलांच्या वेगाने चालण्याची क्षमता आहे. आयएनएस खांदेरीकडे एकूण 360 बॅटरी आहेत. या प्रत्येक बॅटरीचे वजन 750 किलो आहे. त्यामध्ये कायमस्वरुपी मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर असल्याने, पाणबुडी समुद्रात पूर्णपणे शांत राहते.

VIDEO: युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 09:56 AM IST

ताज्या बातम्या