नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ट्रेड्समन मेट (Tradesman Mate) या पदासाठी 1159 जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा नौदलाकडून करण्यात आली आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्टर्न नेव्हल कमांड (Eastern Naval Command), वेस्टर्न नेव्हल कमांड (Western Naval Command) आणि सदर्न नेव्हल कमांड (Southern Naval Command) अशा तीन ठिकाणी मिळून एकूण 1159 जागांवर ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
महत्त्वाचे दिवस
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात : 22 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून
अंतिम तारीख : 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत
पदांची संख्या :
इस्टर्न नेव्हल कमांड : 710 पदं
वेस्टर्न नेव्हल कमांड : 324 पदं
सदर्न नेव्हल कमांड : 125 पदं
एकूण पदांची संख्या : 1159
इस्टर्न, वेस्टर्न आणि सदर्न कमांडमध्ये अनुक्रमे 303, 133 आणि 57 पदं अनारक्षित असून, अन्य पदं विविध वर्गांसाठी राखीव आहेत.
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल वनच्या आधारे वेतन मिळणार आहे. म्हणजेच त्यांचं मासिक वेतन 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये असेल.
पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी पास झालेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. तसंच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणंही आवश्यक आहे. उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे.
या पदाकरिता अर्जाचं शुल्क सर्वसामान्य नागरिक, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातल्या उमेदवारांसाठी 205 रुपये ठेवण्यात आलं आहे. महिला, तसंच माजी सैनिक, पीडब्ल्यूडी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क ठेवण्यात आलेलं नाही.
ऑनलाइन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. अधिक माहितीसाठी : http://www.davp.nic.in/