भारतीय मीडियानेही ग्लोबल होण्याची गरज; पंतप्रधान नरेंद मोदींचा सल्ला

भारतीय मीडियानेही ग्लोबल होण्याची गरज; पंतप्रधान नरेंद मोदींचा सल्ला

'कोरोनाच्या काळात मीडियाने अभूतपूर्व मार्गाने काम केलं आहे आणि नागरिकांना कोरोनाबाबत जागृत केलं आहे. '

  • Share this:

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी सांगितले की, सध्या अशी वेळ आहे की जेथे भारताचा आवाज आणि लोकल वस्तू ग्लोबल होत आहेत. भारताच्या मीडिया इंडस्ट्रीलाही ग्लोबल होण्याची गरज आहे.

भारताचे लोकल प्रोडक्ट ग्लोबल होत आहेत. भारताचा आवाजही अधिक ग्लोबल होत असल्याचे दिसत आहे. जगात भारताचा आवाज आवर्जुन ऐकला जात आहे. आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्ममध्ये भारताचं अस्तित्व खूप दांडगं आहे. अशा परिस्थितीत भारतीय मीडियानेही ग्लोबल व्हायला हवं, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा-45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चीनला मागे परतवलं

कोरोनाच्या काळात मीडियाने अभूतपूर्व मार्गाने काम केलं आहे आणि नागरिकांना कोरोनाबाबत जागृत केलं आहे. त्याबरोबरच सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. वेळेप्रसंगी मीडियाने सरकारवर टीकाही केली आहे. मात्र प्रत्येकाला टीकांमधून शिकायचं असतं..अशातूनही आपली लोकशाही बळकट होईल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

दुसरीकडे भारत-चीन तणावादरम्यान भारताने चीनविरोधात (India-China Rift) अनेक कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने (Central Government) 7.3 लाख कोटी रुपयांचे (100 Billion Dollar) मोबाइल फोन निर्यातीच्या कामासाठी (Mobile Phone Export) अॅपल आणि (Apple) सॅमसंगला (Samsung) मंजुरी दिली आहे.

हे ही वाचा-चीनसोबत तणाव असताना भारतीय सैन्याने दाखवली माणुसकी; 3 चिनी नागरिकांचा वाचवला जीव

तर दुसरीकडे भारतीय मोबाइल फोन मेकर्स माइक्रोमॅक्‍स, लावा, कार्बन, ऑप्‍टीमस आणि डिक्‍सन सारख्या कंपन्या भारतात स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारने या सर्व कंपन्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे चीनच्या कंपन्यांना मोठा झटका बसणार असून भारतीय बाजारात त्यांचा दबदबा संपुष्टात येईल.

Published by: Meenal Gangurde
First published: September 8, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या