Home /News /news /

TikTok शी स्पर्धा करण्यासाठी भारतीयाने बनवलं Mitron अ‍ॅप, 50 लाखांपेक्षा अधिकांनी केलं डाऊनलोड

TikTok शी स्पर्धा करण्यासाठी भारतीयाने बनवलं Mitron अ‍ॅप, 50 लाखांपेक्षा अधिकांनी केलं डाऊनलोड

टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी Mitron हे अ‍ॅप आले आहे. विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे अ‍ॅप 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड देखील करण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : टिकटॉक (TikTok) बाबत देशामध्ये सध्या विविध विवाद सुरू आहेत. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक हा वाद तर शिगेला पोहोचला होता. त्याचप्रमाणे अनेकांनी या चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्यासाठी टिकटॉक फोनमधून अनइन्स्टॉल करण्यास सुरूवात केली आहे. टिकटॉकचे गुगल प्ले स्टोअरवरील (Google Play Store) वरील रेटिंग देखील 2.9 वर पोहोचले आहे. दरम्यान या टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी Mitron हे अ‍ॅप आले आहे. विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे अ‍ॅप 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड देखील करण्यात आले आहे. चिनी असणाऱ्या टिकटॉकवर बहिष्कार टाकला जात असल्याने अनेकांनी या भारतीय अ‍ॅपला प्राधान्य दिले आहे. एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅप IIT रुडकीचा विद्यार्थी असणाऱ्या शिवांक अग्रवालने विकसीत केले आहे. (हे वाचा-Truecaller वरील 4.75 कोटी लोकांचा डेटा विकला जाणार, तुमचा नंबर नाही ना?) गुगल प्ले स्टोअरवरील टॉप चार्टमध्ये पाचव्या स्थानावर Mitron हे अ‍ॅप आले आहे. मात्र अद्यापही टिकटॉक दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये आरोग्य सेतू हे अ‍ॅप पहिल्या स्थानावर असून व्हॉट्सअ‍ॅप तिसऱ्या आणि झूम चौथ्या स्थानावर आहेत. मात्र अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या मित्रों या भारतीय अ‍ॅपने पाचवे स्थान पटकावले आहे. या अ‍ॅपचे रेटिंगही टिकटॉकपेक्षा जास्त आहे. (हे वाचा-हृदयाचे आजार असलेल्या वृद्धांची लॉकडाऊनमध्ये कशी घ्यावी काळजी? ) प्ले स्टोअरवर अनेकांनी या अ‍ॅपचे कौतुक केले आहे. एका युजरने असे म्हटले आहे की, 'मला चांगलं वाटत आहे कारण हे एक भारतीय अ‍ॅप आहे आणि मी ते वापरत आहे', त्याचप्रमाणे या अ‍ॅपमध्ये असणाऱ्या त्रुटी डेव्हलपरने लवकरात लवकर कमी कराव्यात अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात अनेकदा 'मित्रो' हा शब्द येतो. त्यामुळे या अ‍ॅपच्या नावाची अनेकांना गंमत वाटत आहे. त्याचप्रमाणे या अ‍ॅपचे फीचर टिकटॉक सारखेच आहेत. हे अ‍ॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवरच उपलब्ध आहे, iOS वर अद्याप उपलब्ध नाही आहे.

    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या