Home /News /news /

महाराणा प्रताप यांच्या भाल्याचं वजन खरंच 81 किलो होतं का? वाचा काय आहे सत्य

महाराणा प्रताप यांच्या भाल्याचं वजन खरंच 81 किलो होतं का? वाचा काय आहे सत्य

मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, अफाट धैर्य, साहस आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून महाराणा प्रताप (Maharana Pratap) ओळखले जातात. त्यांच्या भाल्याचं वजन भाल्याचं वजन 81 किलो होतं असं सांगितलं जातं.

    मुंबई, 27 मे : मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, अफाट धैर्य, साहस आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून महाराणा प्रताप (Maharana Pratap) ओळखले जातात. महाराणा प्रताप यांच्या त्यागाची आणि पराक्रमाची महती सर्वांनाच मान्य आहे. संपूर्ण देशासाठी ते वंदनीय आहेत. महाराणा प्रताप यांच्याबद्दलच्या चर्चेत त्यांच्या भाल्याची आणि चिलखतीचा विषय नेहमी निघतो.  महाराणा प्रतापांच्या या शस्त्रांचं वजन खूप होतं. तसंच ते वजनी चिलखत आणि भाला घेऊन युद्धात लढत असत, असं म्हटलं जातं. भाल्याचं वजन 81 किलो होतं, तर त्यांच्या चिलखताचं वजन 72 किलो होतं असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तर, काही रिपोर्ट्सनुसार, त्यांचं चिलखत, भाला (Spear) आणि ढालीचं एकूण वजन 208 किलो होतं. त्यामुळे एवढ्या वजनासकट ते युद्धासाठी रणभूमीवर कसे उतरायचे, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये कायम असते. तुम्हीही महाराणा प्रताप यांच्या भाल्याबद्दलच्या या प्रकारच्या अनेक कथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील असतील.  आज आम्‍ही तुम्‍हाला त्‍याच्‍या भाल्‍याबाबतची खरी माहिती सांगणार आहोत. PM मोदींचे 24 तास : साडेतीन तास झोप, 18 तास काम, सकाळी या गोष्टीने करतात दिवसाची सुरुवात काय आहे सत्य? खरं तर महाराणा प्रताप यांचे भाले, चिलखत, तलवारी आणि ढाली यांच्या वजनांबाबत तुम्ही आतापर्यंत जे काही वाचलं आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही. 'एबीपी न्यूज'नं दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या भाल्याचं वजन खूपच कमी होतं. उदयपूर येथील सिटी पॅलेस म्युझियममध्ये (City Palace Museum) याबाबतची माहिती सापडते. या म्युझियममध्ये याबाबत एक खास बोर्ड लावण्यात आला आहे. त्यानुसार महाराणा प्रताप यांच्या शस्त्रांचं एकूण वजन 35 किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.   35 किलो वजनांची शस्त्रं घोड्यावर घेऊन ते रणांगणावर जात असत. महाराणांच्या भाल्याचं वजन 17 किलो होतं, असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान उदयपूर एटीओ (सहाय्यक पर्यटन अधिकारी) जितेंद्र माळी यांनीही टीव्ही 9 शी बोलताना महाराणा प्रताप यांच्या शस्त्राचं एकूण वजन 35 किलो आहे, अशी माहिती दिली आहे.
    First published:

    Tags: History, Rajasthan

    पुढील बातम्या