हाच खरा अर्जुन! 102 ट्रॉफी विकून 'या' भारतीय खेळाडूने कोरोनाबाधितांसाठी दिले 4 लाख

15 वर्षांच्या या खेळाडूने आपल्या सर्व ट्रॉफी विकून जमलेले पैसे PM care Fund ला दिले आहेत.

15 वर्षांच्या या खेळाडूने आपल्या सर्व ट्रॉफी विकून जमलेले पैसे PM care Fund ला दिले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 08 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सरकारची चिंताही वाढली आहे. पीएम मोदींनी लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे तसेच, कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडसाठी दान देण्याचे आवाहनही केले आहे. आतापर्यंत देशातील अनेक बड्या व्यक्तींनी कोट्यावधी रुपयांची देगणी दिली आहे. याच क्रीडा क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे. कोरोनाच्या या लढ्यात सरकारला मदत करण्यासाठी अर्जुन भाटी यांने आपल्या 102 ट्रॉफी विकून पैसे जमवले. त्यानंतर त्याने पंतप्रधान केअर फंडात 4 लाख 30 हजार रुपये जमा केले. अर्जुनने ट्वीट करत, “नमस्ते. श-विदेशात जिंकलेल्या ट्रॉफी या संकटकाळात मी 102 लोकांना दिल्या आहेत. त्यातून मिळालेले एकूण 4 लाख 30 हजार रुपये पीएम केअर्स फंडात मदत म्हणून दिले. हे ऐकून आजी रडली आणि म्हणाली तु खरंच अर्जुन आहे. आज देशातील लोक वाचले पाहिजेत, ट्रॉफी तर पुन्हाही मिळवशील देशाच्या लोकांना वाचवले पाहिजे, ट्रॉफी पुन्हा जिंकेन'', असे सांगितले. वाचा-VIDEO : शास्त्रींच्या कमेंट्रीचा पोलिसांकडून असाही वापर, लोकांना लावलं पळवून वाचा-कोरोनाच्या लढ्यात पाकला अशी घ्यावी लागली जसप्रीत बुमराहची मदत पंतप्रधान मोदींनीही अर्जुनचे कौतुक केले आहे. मोदींनी, "ही देशवासियांची भावना आहे, जी कोरोना साथीच्या काळातली सर्वात मोठी साथ आहे.", असे ट्वीट केले. यावर अर्जुनने पंतप्रधान मोदींचे ट्विट पुन्हा ट्विट केले, "धन्यवाद सर! मी हे तुमच्याकडूनच शिकलो आहे". वाचा-खेळाडूंना नैराश्यातून बाहेर काढलं, त्याच डॉक्टरांनी कोरोनामुळे केली आत्महत्या 15 वर्षांच्या अर्जुननं आतापर्यंत 150 गोल्फ टूर्नामेंट खेळल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये झालेली ज्युनियर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिपचा अर्जुन विजेतासुद्धा झाला होता. याआधी त्यानं 2016 साली अंडर- 12 आणि 2018 रोजी अंडर 14 वयोगटातून गोल्फ वर्ल़्ड चॅम्पियनशिप मिळवली आहे. संपादन-प्रियांका गावडे
    First published: