मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर धोनीची शेती क्षेत्रातही धुव्वादार बॅटींग; 'सर्वश्रेष्ठ गोपालक' पुरस्काराने गौरव

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर धोनीची शेती क्षेत्रातही धुव्वादार बॅटींग; 'सर्वश्रेष्ठ गोपालक' पुरस्काराने गौरव

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने  (BAU) 'सर्वश्रेष्ठ गोपालक' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने (BAU) 'सर्वश्रेष्ठ गोपालक' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने (BAU) 'सर्वश्रेष्ठ गोपालक' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

रांची, 06 मार्च: गेल्या काही वर्षांत क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका पिटल्यानंतर महेंद्र सिंग धोनी शेती क्षेत्रातही चांगल्याचं फॉर्ममध्ये आहे. धोनीने अलीकडेच्या त्याच्या शेतात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. त्याच्या या यशाच्या बातम्या अनेक वृत्तमाध्यमांनी कव्हर केल्या होत्या. यानंतर आता तो 'सर्वश्रेष्ठ गोपालक'ही बनला आहे. बिरसा अॅग्रीकल्चर यूनिवर्सिटीने  (BAU) धोनीला हा मानाचा पुरस्कार देवून त्याचा सन्मान केला आहे.

शुक्रवारी झारखंडचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ मेहतो यांनी हा मानाचा पुरस्कार, धोनीचा कर्मचारी कुणाल गौरव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी बोलताना कुणाल गौरव यांनी सांगितलं की, हा क्षण त्यांच्यासाठी खूप अभिमानाचा आहे. महेंद्र सिंग धोनी त्यांच्या गायी- म्हशींवर खूप प्रेम करतात. ते ज्यावेळी इकडे गावी असतात, तेव्हा किमान एकदा तरी या गायींना भेटायला येतात. त्यांना प्रेमाने चारा खाऊ घालतात, पाणी पाजतात.

धोनीच्या गोठ्यात 73 गायी, तर 400 लिटर दूधाची दररोज विक्री

हा पुरस्कार मिळाल्यानंतर कुणाल गौरवनं सांगितलं की, सध्या धोनीकडे एकूण 73 गायी आहेत. यामध्ये काही गायी फ्रीजियन आणि साहीवाल जातीच्या आहेत. या सर्व गायी पंजाबहून आणल्या आहेत. याठिकाणी दररोज सुमारे 400 लिटर दुधाचं उत्पादन घेतलं जातं. या गायांचं सर्व दूध काउंटरवरूनच विकलं जातं. रांचीच्या लालपूरमधील ईज फार्ममधूनच सर्व दूध विकलं जातं. फ्रीसियन जातीच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 55 रुपये भाव आहे, तर साहिवाल जातीच्या गाईचं दुध 85 रुपयांत घरपोच केलं जातं.

हे ही वाचा - महेंद्रसिंह धोनी बनला पूर्णवेळ शेतकरी, वाचा काय आहे पुढची योजना!

गौरव यांनी पुढे सांगितलं की, धोनी गायींची देखभाल करण्यासोबतच व्यावसायिकदृष्ट्या देखील विचार करतात. त्यांच्या खानपानासोबतच त्यांना दिल्या औषधांची देखील काळजी घेतात. एवढंच कशाला दुधाच्या प्रत्येक लिटरचा हिशोबही ठेवला जातो. अशी माहितीही त्यांनी दिली आहे. सध्या धोनीच्या गोठ्यात 300 गायी ठेवण्याची जागा आहे. याव्यतिरिक्त धोनी सध्या गायीचा खास ब्रीड तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच या गायी येथील शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी देखील उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहितीही गौरव यांनी दिली आहे.

First published:

Tags: Jharkhand, MS Dhoni, Organic farming, Ranchi