पाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 16 मे : पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना आज गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलंय.

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले होते.

या निर्णयानुसार जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी माजी आमदार हसमुख जगवानी उपस्थित होतं.

गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात राहिलेल्या आणि आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी या निमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे असं यावेळी डॉ. पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 07:45 PM IST

ताज्या बातम्या