BREAKING: भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे चीन, लडाखजवळ दिसली लढाऊ विमानं

BREAKING: भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहे चीन, लडाखजवळ दिसली लढाऊ विमानं

लडाखपासून अवघ्या 30-35 किमी अंतरावर एलएसीजवळ चिनी सैनिकांचं लढाऊ विमान (Chinese fighters flying)उड्डाण करताना दिसल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : भारत-चीनमध्ये (India-China border dispute) लडाखवरून वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) सीमा विवादात तणाव आहे. त्यामुळे भारताचं सीमाभागातील चीनच्या सर्व हालचालींवर लक्ष आहे. दरम्यान, लडाखपासून अवघ्या 30-35 किमी अंतरावर एलएसीजवळ चिनी सैनिकांचं लढाऊ विमान (Chinese fighters flying)उड्डाण करताना दिसल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, चीनी लढाऊ विमान होटन और गरगुंसाच्या लक्ष्यापासून सुमारे 100-150 किमी अंतरावर आहेत.

चिनी सैन्याच्या हालचालींवर नजर

चीनच्या लडाख सीमेजवळ सुमारे 10-12 लढाऊ विमान तैनात केले असून ही सर्व भारतीय हद्दीत उड्डाण करत असल्याची माहिती वृत्तसंस्थेला सूत्रांकडून मिळाली आहे. हे लढाऊ विमान होटन और गरगुंसामधील विमानतळांवरून उड्डाण करत आहेत आणि लडाख क्षेत्रापासून 30-35 किलोमीटर अंतरावर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत या लढाऊ विमान जे -11 आणि जे -7 च्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.

कोरोना संकटकाळात 'निसर्ग'चा प्रकोप ? उद्या समजणार नेमकं कुठं धडकणार चक्रीवादळ

होटन बेसवर आहे बारिक नजर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय प्रदेशांपासून 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. भारतीय सैन्याची नजर होटन तळावर आहे. कारण, पाकिस्तानी वायुसेनाही तिथल्या पीएलए हवाई दलाबरोबर सराव करत आहे. या वर्षाच्या मे महिन्यात चीनने चकमकीची परिस्थिती निर्माण होताच भारताने आपले सुखोई -30 एमकेआय विमान तयार केले होते.

भारत चीनकडून होत असलेल्या सर्व कामांवर बारकाईने नजर ठेवून आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. भारतीय गुप्तचर संस्था चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या वर्षीदेखील 6 पाकिस्तानी जेएफ -17 च्या हालचालींवर भारताने नजर ठेवलं होतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लडाखच्या पश्चिमेला भाग असलेल्या स्कार्डू एअरफील्डवरून होटनकडे पाकिस्तानी विमानानं उड्डाण केलं. यानंतर पाकिस्तानी लष्कराने इथल्या शमीन -8 नावाच्या एका अभ्यासात भाग घेतला होता.

First published: June 2, 2020, 7:29 AM IST

ताज्या बातम्या