Home /News /news /

सियाचिनध्ये सैन्याचे मोठे हाल, थंडीने गारठून भारतीय जवानाचा मृत्यू

सियाचिनध्ये सैन्याचे मोठे हाल, थंडीने गारठून भारतीय जवानाचा मृत्यू

काल CAG चा अहवाल आला होता, यानुसार सियाचिनमध्ये जवानांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडे आणि अन्न-धान्य पूरवलं जात नाही

    डेहराडून, 5 फेब्रुवारी : सियाचिनमध्ये उणे 26 अंश सेल्सिअस वातावरणात तैनात असलेले एक भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.  उत्तऱाखंड येथे राहणारे जवान रमेश बहुगुणा सियाचिन सेक्टर येथे तैनात होते. अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना चंडीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भयंकर थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 38 वर्षांचे जवान रमेश बहुगुणा यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. बहुगुणा 2002 साली लष्करात रुजू झाले होते. त्यांचे बंधू भाई दिनेश दत्त बहुगुणा म्हणाले, सियाचिनमधील भयंकर थंडीमुळे त्यांचे बंधू आजारी पडले होते. जवान बहुगुणा यांचा अत्यंसंस्कार ऋषिकेशमधील पूर्णानंद घाट येथे करण्यात आला. सियाचिनमध्ये जवानांना ड्यूटी करणे अत्यंत कठीण दुर्गम भाग आणि अधिक उंचावर असल्याने जम्मू-काश्मिरच्या सियाचिन सेक्टरमधील तैनात जवानांना ड्यूटी करणे फार कठीण जाते. कालच नियंत्रक आणि लेखा परीक्षक (CAG) च्या रिपोर्टनुसार सियाचिन आणि लडाखमध्ये तैनात जवानांना थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे बहुगुणा अचानक शहीद होणं ही बाब अधिक चिंता निर्माण करते. याशिवाय त्यांच्या स्नो गॉगल्स, बूट, जॅकेट, स्लीपिंग बॅग यांची कमतरता आहे. रिपोर्टनुसार सियाचिनमधील तैनात सैनिकांना रेशनदेखील कमी मिळते. यावर सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे म्हणणे आहे, हा रिपोर्ट 2015-16 या वर्षाचा आहे. ते म्हणाले की येथील प्रत्येक जवानाला 1 लाख रुपयांपर्यंतचे कपडे दिले जातात. 2020 साठी आम्ही पूर्णत: तयार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Indian army, Siachen

    पुढील बातम्या