नवी दिल्ली, 8 मार्च : विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात पाठवून आम्ही शांततेच्या दृष्टीनं भारताकडे हात पुढे करत आहोत अशी भूमिका असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं. पण, प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. काश्मीर घाटीमध्ये देखील दहशतवादी कारवाया सुरू आहेत. शिवाय, पाकिस्ताननं सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य तैनात केले. त्यानंतर पाकिस्तान युद्धाची तयारी करत आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे भारतानं देखील आता गाफिल न राहता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे. शिवाय, पाकिस्तानची सज्जता पाहता भारतानं देखील आता सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. कर्नल रॅंकचे अधिकारी देखील सीमेवर तैनात करण्यात आले असून ही संख्या वाढवली जाणार आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. त्याच पार्श्वभूमिवर आता सीमेवर दोन्ही देशांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
अयोध्या वाद मिटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय
खूप अधिपासून सुरू होती तयारी
दरम्यान, सैन्याला सीमेवर मोठ्या प्रमाणात तैनात करण्याचा निर्णय हा अचानकपणे घेण्यात आलेला नाही. खूप पूर्वीपासून याबद्दल तयारी करण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयाची अंंमलबजावणी करण्यात आली.
तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांना अधिकार
पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना याची शिक्षा नक्की मिळेल असा इशारा दिला होता. शिवाय, दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे अधिकार हे तिन्ही सेना दल प्रमुखांना दिल्याचं मोदींनी स्पष्ट केलं होतं.
सध्या दहशतवादी हल्ले वाढत असून पाकिस्तानी सैन्य देखील भारतीय चौक्यांना लक्ष्य करत आहे. त्याला देखील भारतीय सैन्य जशास तसे उत्तर देत आहे.
SPECIAL REPORT : मंदिरांच्या नाशिकनगरीत, 71 धार्मिक स्थळं अनधिकृत!