News18 Lokmat

'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'!

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2018 11:31 PM IST

'सर्जिकल स्ट्राईकदरम्यान सैनिकांकडे होती बिबट्याची विष्ठा आणि मूत्र'!

पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यात थोरले बाजीराव प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार निवृत्ती लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेंद्र निंभोरकरांनी सर्जिकल स्ट्राईकचे आपले अनुभव सांगितले. गनिमीकावा आणि गुप्ततेच्या बळावरच सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्याचं ते म्हणाले.

पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत असताना भारतीय सैन्याला सर्वात मोठी समस्या होती ती कुत्रे भुंकण्याची...जर असं झालं तर शत्रूला कळून येईल की आपण आलोय. म्हणून सैन्याने आपल्यासोबत बिबट्याची विष्ठा आणि मुत्र सोबत ठेवले होते असा किस्सा निवृत्ती लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितला.

बिबट्याची विष्ठा आणि मुत्रामुळे श्वान हे शांत राहतात. असाच प्रकार सर्जिकल स्ट्राईकदरम्यान घडला आणि सैन्याने आपली कारवाई चोख बजावली असंही निंभोरकर यांनी सांगितलं.

निंभोरकर हे नौशेरा सेक्टर इथं ब्रिगेड कमाण्डर म्हणून काम पाहिलं. सर्जिकल स्ट्राईकच्या आधी त्यांनी याबद्दलचा सर्व अभ्यास केला होता.

निंभोरकर यांनी सांगितलं की, याच भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. ते कुत्र्यांवर हल्ला करताय. टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, "सर्जिकल स्ट्राईकची रणनिती आखत असताना लष्करी कुत्रे भुंकतील याची शक्यता होती. याबद्दल माहितीही होती. त्यामुळे हे रोखण्यासाठी आम्ही सैनिकांकडे बिबट्याची विष्ठा आणि मुत्र सोबत ठोवण्याचं सांगितलं. गावात पोहोचल्यावर त्यांनी वेशीवर मुत्रा शिंपाडले. यामुळे याचा चांगला फायदा झाला. कुत्रे तेथून पळून गेले."

Loading...

सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय सैन्याने उरी हल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या सीमारेषेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. उरी इथं दहशतवादी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.

माजी सेनाप्रमुख दलबीर सिंह यांच्या कार्यकाळात सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईकची कामगिरी पार पाडली होती. जून 2018 मध्ये सर्जिकल स्ट्राईकचे काही व्हिडिओ समोर आले.

=======================================================

VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...