पाकिस्तानहून आलेल्या विमानाला IAF ने जयपूरमध्ये उतरवलं, चौकशी सुरू

पाकिस्तानहून आलेल्या विमानाला IAF ने जयपूरमध्ये उतरवलं, चौकशी सुरू

'Antonov AN-12' हे कार्गो विमान पाकिस्तानहून येत होतं. पण भारतील हवाई दलाने विमानाला घेरलं आणि जयपूर एअरपोर्टवर उतरवलं.

  • Share this:

जयपूर, 10 मे : पाकिस्तानहूनआलेलं एक कार्गो विमान जयपूर एअरपोर्टवर उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानवरून आलेलं हे मालवाहू विमान जबरदस्तीने खाली उतरवल्याचं सांगण्यात येत आहे. 'Antonov AN-12' हे कार्गो विमान पाकिस्तानहून येत होतं. पण भारतील हवाई दलाने विमानाला घेरलं आणि जयपूर एअरपोर्टवर उतरवलं.

दरम्यान, हवाई दलाकडून वैमानिकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर यावर अद्याप भारतीय हवाई दलाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पाकिस्तानहून आलेलं हे मालवाहू विमान भारतील हद्दीत आलं कसं याची चौकशी आता हवाई दलाकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीमध्ये आलेल्या विमानाला लढाऊ विमानाने घेरलं आणि विमान जयपूर एअरपोर्टवर उतरवण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर आता विमानाची तपासणी करण्यात असून भारतील हवाई दलाकडून वैमानिकाचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जॉर्जियाचं कार्गो विमान आहे. जे त्याचा मार्गे चुकला होता. ज्यानंतर हवाई दलाने विमानाला घेरलं आणि जयपूर एअरपोर्टवर उतरवलं. हे विमान पाकिस्तान एअरस्पेसवरून गुजरातकडे येत होतं.  त्याचवेळी भारतील हवाई दलाने विमानाला विमानाला घेरलं.

खरंतर, भारतील हवाई दलाकजून बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून अनेक वेळा लढाऊ विमानांनी भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्याला भारतील हवाई दलाने चोख उत्तर दिलं.

 

VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

First published: May 10, 2019, 6:19 PM IST

ताज्या बातम्या