भारतीय हवाई दलानं घेतला पुलवामाचा बदला; Air Strikeमध्ये अझर मसूदचा मेव्हणा ठार?

भारतीय हवाई दलानं घेतला पुलवामाचा बदला; Air Strikeमध्ये अझर मसूदचा मेव्हणा ठार?

हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता.

  • Share this:

दिल्ली, 26 फेब्रुवारी : पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही


Air Strikeचा निर्णय मोदींचा

Loading...

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.


IndiaStrikesBack- किती शक्तीशाली आहे फायटर जेट मिराज? PAK वर फेकले १ हजार किलोंचे बॉम्ब


12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.


- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.


- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.


- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.


- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.


IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल


<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-345378" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzQ1Mzc4/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...