Home /News /news /

देशातील सर्वात मोठी बातमी; जम्मूमध्ये चिनी नागरिकाच्या नावे भारतीय आधारकार्ड, महाराष्ट्रातून केलं इश्यू

देशातील सर्वात मोठी बातमी; जम्मूमध्ये चिनी नागरिकाच्या नावे भारतीय आधारकार्ड, महाराष्ट्रातून केलं इश्यू

चिनी नागरिकाने भारतीय आधारकार्ड का तयार करून घेतलं, यामागे त्याचा काय हेतू होता? महाराष्ट्रातून त्याला कोणी आधारकार्ड मिळवून दिलं, यासारखे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

    श्रीनगर, 26 मे : जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir police) मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका चिनी नागरिकाला अवैधपणे फिरताना पकडण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चिनी नागरिकाकडे भारतीय आधारकार्ड (Chinese national carrying an Indian Aadhaar card ) सापडलं आहे. जम्मू-काश्मीरमधील गंडेरबाल (Ganderbal district) जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. या चिनी नागरिकाचं नाव यांग झूहोंग असून तो 47 वर्षांचा आहे. तो लेहहून श्रीनगरच्या दिशेने जात होता. यावेळी गंडेरबाल या भागात त्याला पकडण्यात आलं. पोलिसांना त्याच्याजवळ भारतीय आधारकार्ड सापडलं आहे. त्याच्या आधारकार्डाचा क्रमांत 364257589471 आहे. याशिवाय महाराष्ट्रातून त्याला हे आधारकार्ड इश्यू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चिनी नागरिकाने भारतीय आधारकार्ड का तयार करून घेतलं, यामागे त्याचा काय हेतू होता? महाराष्ट्रातून त्याला कोणी आधारकार्ड मिळवून दिलं, यासारखे अनेक सवाल उपस्थित होत आहे. बातमी अपडेट होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Crime news, Jammu and kashmir

    पुढील बातम्या