News18 Lokmat

अंडर 19मध्ये भारत चौथ्यांदा विश्वविजेता, ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा !

अंडर 19मध्ये भारत विश्वविजेता

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2018 01:51 PM IST

अंडर 19मध्ये भारत चौथ्यांदा विश्वविजेता, ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा !

- अंडर19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता, 8 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा केला पराभव, कालराचं शानदार शतक, ऑस्ट्रेलियाचं 217 धावांचं आव्हान भारताने अवघ्या दोन विकेटमध्ये पेललं, विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये भारताने सर्वच्या सर्व मॅच जिंकल्यात. मॅच जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. या विजयानंतर बीसीसीआयने अंडर19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कोच राहूल द्रविडला 50लाखांचं तर  सर्व खेळाडूंना प्रत्येकी 30 लाखांचं बक्षीस तसंच सपोर्ट स्टाफलाही प्रत्येकी 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.

भारतीय संघाने हा सामना डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर आठ विकेट राखून जिंकला. या विजयाबरोबरच भारताने चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले.

आजच्या सामन्यात एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मेरलोने सर्वाधिक 76 धावा केल्या.

#U19CWCFinal

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...